जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

223

अनिल चौधरी, पुणे

जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराज संस्थान यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने पुण्यातील पर्वती परिसरात ११ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत
पाच रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती सदर शिबिरातून एकूण 1120 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले . या रक्तदान शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन महाराजांप्रती एक आशीर्वाद रुपी सेवा दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

स्वामी नरेंद्राचार्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली. या शिबिरासाठी पर्वती विभागातील विविध मान्यवरांनी भेट देऊन जगद्गुरु नरेंद्राचार्य जी महाराजांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले .आमदार माधुरी ताई मिसाळ ,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,दिनेशभाऊ धाडवे,रुपलिताई धाडवे,भीमराव साठे तसेच अविनाश खेडेकर,महेश कदम,गणेश मोहिते, सूनिलजी देवधर , डॉ बाळासाहेब मानकर इतर मान्यवरानीं कार्यक्रमाला हजेरी लावून उपक्रमाचे कौतुक केले.
सदर रक्तदान शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले सर्व महिलांचे आ. माधुरी ताई मिसाळ यांनी कौतुक केले. सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून संस्थानाच्या या उपक्रमासाठी भेट देऊन आम्ही करीत असलेल्या गुरुसेवेसाठी प्रेरणा दिली त्याबद्दल संस्थानच्या पदाधिकाऱ्यानी मान्यवरांचे आभार मानले.
याप्रसंगी संप्रदायाचे बालाजी सूर्यवंशी,सर्जेराव गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष विजयबांदल,निखिल शिंदे,दिनेश डाबी,ललिता केदारी,आशाताई कामथे,तुषार आबेडे,गणेश कुंजीर,विराज तावरे तसेच भाविक भक्तगण प्रवचनकार,पदाधिकारी,साधक,शिष्य बहुसंख्येने उपस्थित होते.