नव्या समाविष्ट गावांच्या रस्त्यासाठी दहा कोटींची तरतूद – आ. संजय जगताप

69

निवृत्ती अण्णा बांदल यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे (प्रतिनिधी)
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजय जगताप यांच्या सूचनेवरून पुणे महानगरपालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या सुमारे दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
सातव संस्कृती स्कूल जवळ पूल एक कोटी पंधरा लाख, जगदंबा भवन कडे जाणारा शिव रस्ता सहा कोटी, आंबेकर हॉटेल समोरील ऑर्चिड स्कूल कडे जाणारा रस्ता 60 लक्ष, बिशप स्कूल ते संस्कृती स्कूल कडे जाणारा रस्ता एक कोटी 20 लक्ष या विकास कामांचा शुभारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उंड्री चौकात करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती अण्णा बांदल, माजी उपसभापती सचिन घुले, माजी सरपंच संजय जाधव, संदीप बांदल, सुभाष बापू थिटे, नितीन सुभाष घुले, देवानंद मासाळ, महिला आघाडी प्राजक्ता पेठकर, आबासाहेब दगडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय जगदंब भवन रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी दशरथ भागवत, शितल दीदी, अश्विनी दीदी, दत्ता भाई, तेजस्विनी गोळे, सेंटरचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये अनेक नागरी सुविधा प्रलंबित आहेत या भागासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळणे अपेक्षित आहे खासदार सुप्रियाताई सुळे व मी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न करत आहोत येथील भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत, असे सांगून आमदार संजय जगताप म्हणाले, लोकसभा निवडणूक होत आहे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी भावनिक न होता सुप्रियाताई यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात मोठ्या प्रमाणात कामे केली व संसद रत्न पुरस्कार देखील मिळवले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा खासदार होण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर हवेली भागात पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग असून सुप्रियाताई यांनी केलेली विकास कामे व दांडगा जनसंपर्क यामुळे तुतारी फुंकणारा माणूस घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत, पुन्हा सुप्रियाताईच निवडून येतील असा विश्वास पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवृत्ती अण्णा बांदल यांनी व्यक्त केला.
महापालिकेतून या गावांसाठी निधी मिळावा म्हणून निवृत्ती अण्णा बांधील आणि सचिन घुले यांनी पाठपुरावा केला होता.
महाशिवरात्री निमित्त प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयच्या वतीने साकारलेल्या रामेश्वरम मंदिराचे उदघाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.