जागतिक महिला दिनानिमित्त अर्निका चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत आरोग्य शिबीर

206

कोंढवा प्रतिनीधी,

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अर्निका चॅरिटेबल ट्रस्ट व भाजपा नेत्या स्न्हेहल दगडे यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन पिसोळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी पाचशे महिलांची शुगर टेस्ट, बीपी टेस्ट , बीपी मॉनिटरिंग आणि विविध आजारावरील तपासण्या करण्यात येऊन महिलांना आणि लहान मुलांना औषधांचे वाटप करण्यात आले.

अर्निका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना नुकतीच खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली असून आपण समाजातील गोर गरीब तसेच शेवटच्या घटका पर्यंत मदत करण्यात असल्याचे अध्यक्षा डॉकटर रसिका लोणकर-गोते यांनी सांगितले. जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य घेऊन आम्हीं समाजातील तळागाळातील गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा तसेच इतर मदत करणार असल्याचे ट्रस्ट चे संस्थापक उपाध्यक्ष निखिल लोणकर यांनी सांगतले .आरोग्य शिबिरामध्ये प्रथमच उपचार घेणाऱ्या अनेक महिला होत्या त्यांची आरोग्य तपासणी केल्यावर त्यांना शुगर तसेच काही महिलांना बीपी तसेच इतर आजार आल्याचे त्यांना सांगण्यात येऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मोफत ओषधे उपलब्ध करून देण्यात आली, तसेच पुढील तपासणी साठी फॉलो अप घेण्यासाठी सुचना देखील देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ उज्वला हरपळे डॉ.रसिका लोणकर, डॉ.नेहा शेवाळे, डॉ. पूर्णिमा गविमाठ , स्नेहलताई दगडे, राजेंद्र भिंताडे, उषा गोते , संजीवनी देवकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.