विश्वास पॅरामेडिकल संस्थेच्या माध्यमातून पदवी व व्यावसायिक संधी – जयंत टिळेकर

124
हडपसर मध्ये रंगला विद्यार्थी पदवी प्रदान व बक्षीस सोहळा सोहळा
अनिल चौधरी पुणे 
आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे संचलित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स पदवी प्रदान सोहळा व बक्षीस वितरण समारंभ हडपसर येथील नोबेल एचएमए भवन मध्ये आयोजित करण्यात आला होता. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील जीवनात सामाजिक कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.पदवीबरोबरच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सिल्व्हर, ब्रँझ, गोल्ड पदक देण्यात आले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम क्यू आर फार्मासेटयुकल्स चे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर जयंत टिळेकर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद शिंदे, माजी उपसभापती भूषण तुपे,  शासन नियुक्त नगरसेवक वंदना कोद्रे, अजित आबा घुले, कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर प्राचार्या डॉ.अश्विनी शेवाळे, शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी खराडी प्राचार्य सचिन कोतवाल, जीव रसायनशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ प्रमुख डॉ.पूजा दोशी, ग्रामपंचायत सदस्य तुषार झुरंगे, आरोग्य विद्या प्रसारक मंडळाचे मानस सचिव ज्ञानेश्वर रायकर, खजिनदार अक्षय राऊत, संचालक तीर्थराज शिंदे, संचालक प्रफुल्ल कोद्रे,  इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य स्वाती आंबेकर, डॉ.विजय साळवे, संदीप मेमाणे आदी उपस्थित होते.
पॅरामेडिकल संस्थेचे पदवी प्राप्त विद्यार्थी डॉक्टर आणि समाज यांच्यातील दुवा आहेत, समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम करावे, प्रसाद कोद्रे व जयंत टिळेकर यांनी शिक्षण देऊन व्यवसायास मार्गदर्शन उपक्रम कौतुकास्पद आहे. असे शासन नियुक्त नगरसेवक भूषण तुपे यांनी सांगितले.
पदवी मिळाल्यावर जबाबदारी वाढते, विद्यार्थ्यांनी समाजाची सेवा करावी व आपल्या संस्थेचे नाव उज्वल करावे असे आवाहन डॉ.जयंत टिळेकर यांनी केले.
आयोजन व प्रास्ताविक ॲड. प्रसाद कोद्रे यांनी केले. प्रास्ताविक मध्ये वर्षभर संस्था राबवित असलेल्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी वाटप करण्यात आले, भविष्यात जॉब व व्यवसायासाठी मार्गदर्शन करणार असल्याचेही ॲड. प्रसाद कोद्रे यांनी सांगितले.यावेळी विविध स्पर्धेमध्ये सहभागी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन सत्कार करण्यात आला. 
 रेडिओ जॉकी  अभय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन  विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स चे संस्थापक ॲड. प्रसाद सुभाष कोद्रे,  प्राचार्या डॉक्टर स्वाती आंबेकर, दर्शन ईशी, पांडुरंग बन्नर यांनी केले.