दीपक बुंदेले ह्यांच्या फ़ोटोबुक चे शर्मिला ठाकरे ह्यांचे हस्ते प्रकाशन

1191

अनिल चौधरी, पुणे :-

पुण्यातील प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक, सिनेपत्रकार, संग्राहक, विक्रमवीर दीपक बुंदेले ह्यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स झाल्याची दखल घेऊन मराठी हृदयसम्राट राज ठाकरे ह्यांनी दीपक बुंदेले ह्यांना थेट आपल्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ दादर, मुंबई येथे आमंत्रित करून यथोचित सत्कार केला व त्याचबरोबर राज ठाकरे ह्यांच्या निवासस्थानी दीपक बुंदेले ह्यांच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स फ़ोटो Oबुकचे’ शर्मिला राज ठाकरे ह्यांच्या हस्ते प्रकाशन ही करण्यात आले सदरील प्रकाशनास आघाडीचे संगीतकार अजय-अतुल ही उपस्थित होते.
दीपक बुंदेले ह्यांच्या विक्रमाची अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी दखल घेतली आहे दीपक बुंदेले ह्यांच्या अनेक वृत्तपत्रात तसेच टीव्ही व रेडियो वर अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.त्याचबरोबर त्यांना ‘युवा-भारत पुरस्कार’, ‘पत्र-मित्र पुरस्कार’  भारत सरकार तर्फे ‘सुवर्ण जयंती पदक’ असे अनेक पुरस्कार प्रदान झाले आहेत.