शिवसंस्कारासाठी आठ महिन्यांच्या गर्भवतीने महिलेने केला रायगड चढण्याचा पराक्रम

818

गिरीश भोपी:- पनवेल/रायगड-

आपल्या बाळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार व्हावे यासाठी चक्क एका आठ महिन्यांच्या गर्भवतीने महिलेने रायगड चढण्याचा पराक्रम केलाय. कोमल अभिजीत पाटील असं या महिलेचं नाव आहे.

आपल्या गर्भात असलेल्या बाळावर शिवसंस्कार व्हावेत अशी कोमल पाटील यांची इच्छा होती. त्यामुळे त्यानी जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून 12 जानेवारीला रायगड चढण्याचा पराक्रम केला.

दरम्यान, बाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उतरून जाणारी हिरकणी इतिहासात प्रसिध्द आहे. तश्याचं एका हिरकणीचं दर्शन आज महाराष्ट्राला पुन्हा एखदा घडलय.