पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड’ने दिलीप प्रभावळकर सन्मानित

767

अनिल चौधरी , पुणे

या वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ने सन्मानित अभिनेते, लेखक  दिलीप प्रभावळकर यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –

–       पोटापाण्यासाठी तुम्ही जे  काम करता ती तुमची उपजीविका असते मात्र मनापासून जे करता ती जीविका ठरते, माझ्या बाबतीत मी कलाकार म्हणून काम करीत असताना जीविका हीच उपजीविका झाली.
–       माझ्यावर पु.ल. देशपांडे यांचा प्रभाव आहे. पुलं स्वत:कडेही विनोदाने पाहायचे. ते कोणाची मिमिक्री करतात असं कधीच वाटलं नाही कारण त्यांना त्या भूमिकेतलं मर्म कळलेले होते  त्यामुळे पुलं हे पुलं म्हणूनच समोर आले हे त्यांचे वैशिष्ट्य होते .
–       ज्याप्रमाणे संगीताला कान लागतो, त्याप्रमाणे विनोदालाही दृष्टी असावी लागते.
–       मला लाउड ह्युमरपेक्षा  फार आक्रस्ताळेपणा नसलेला,  मिश्कील – ज्याला ‘टंग इन चीक’ विनोद म्हणतात तो करायला जास्त आवडते .

–       माझ्यात स्वभावत: लाजाळू व्यक्ती आहे, मात्र व्यक्त होण्याची एक आत्मिक इच्छा आधीपासूनच होती, त्यामुळेच विविध माधामात काम करतानाही माझ्या हातून  लेखन होऊ शकले

–       आजच्या बदललेल्या भाषेचा काही प्रमाणात त्रास होतो. तुझी मदत करू का ? अशीहिंदीचा प्रभाव असलेली  वाक्ये येतात तेव्हा वाईट वाटतं.
–       माझ्या निरागस हास्यामुळे ‘मुन्नाभाई लगे रहो’ चित्रपटात गांधीजींची भूमिका मिळाली.
–       नाटकात भूमिका घडवता येते. सिनेमामध्ये ती आधीच डोक्यात पक्की लागते.

–       चित्रपट हे एक प्रभावी आणि दिग्दर्शकाचे माध्यम आहे.
–       ‘बायोपिक’ हा विषय संशोधन करीत जबाबदारीने तो विषय हाताळला गेला पाहिजे, असे मला वाटते.
–       ल्युई फिशर यांच्या गांधींवरील पुस्ताकामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात गांधी साकारताना मदत झाली. या पुस्तकामुळे एक व्यक्ती म्हणून महात्मा गांधी माझ्या समोर आले.
–       मुन्नाभाई  या चित्रपटातील महात्मा गांधी यांची व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तीरेखेतला मी  प्रेक्षकांना आवडेल का असा प्रश्न होता. मात्र प्रेक्षकांनी हे दोन्ही स्वीकारलं याचा आनंद आहे.
–       कोणतीही व्यक्तीरेखा साकारताना मी केवळ दिग्दर्शकावर विश्वास ठेवतो व त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करतो. मुन्नाभाईच्या वेळी मी तेच केलं.