पनवेल महानगरपालिकाच्या समोर उभ्या असलेल्या बेवारस कार वर कारवाईची मागणी

1070

गणेश शिंदे प्रतिनिधी, पनवेल

पनवेल महानगरपालिके समोर  उभ्या असलेली मारुती सिझुकी स्विफ्ट कार क्रं.एम एच ४६ झेड २२२१ ह्या कार वर  कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे .

सदर गाडी गेली सहा दिवसांपासून नगरपालिकेसमोर उभी असून , याठिकाणी मनपा चे अधिकारी तसेच पोलिसांचे लक्ष जात नसल्याचे पाहून नागरीकांना आश्चर्य वाटत आहे. याबाबत एका सजग नागरिकाने आमचे मल्हार न्यूज चे वृत्तप्रतिनिधी गणेश शिंदे यांना दूरध्वनी वरून संपर्क करुन याबाबतची माहिती देऊन वृत्त प्रसारित करण्याची विनती केली . त्यानुसार आमच्या प्रतिनिधीने सदर गाडी मालकाचा शोध घेतला असता हि गाडी हर्षद पोटे यांच्या नावावर नोदं असल्याचे समजले.याबात मनपा आयुक्तांशी संपर्क केला असता तो झाला नाही, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता तो झाला नाही.