‘झी युवा सन्मान’ लवकरच झी युवावर

924

अनिल चौधरी, पुणे

फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर रविवार २० जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल.

पुरस्काराच्या मालिकेत दहा क्षेत्रातील युवकांना सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्तीपटू राहुल आवारे याला ‘झी युवा क्रीडा सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तरुण वाचक घडवणारा युवा लेखक आनंद बनसोडे ‘साहित्य सन्मान’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संतोष गर्जे यांना सामाजिक जाणीव हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देवानंद लोंढे याला ‘उद्योजक सन्मान’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पाणी बनवणारी मशीन हा अद्भुत शोध लावणाऱ्या जव्वाद पटेल याची निवड ‘विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान’ पुरस्कारसाठी झाली आहे.  लोकगीताचा बाज जपत संगीत प्रयोगशील करणारी गायिका रेश्मा सोनावणे हिला ‘संगीत सन्मान’ चा किताब प्रदान करण्यात येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त युवा नेतृत्व हा सन्मान ‘आदित्य ठाकरे’, निलेश साबळे यांच्या कला क्ष्रेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘कला सन्मान’, अभिनेत्री श्रेया पिळगावकर हिला ‘युवा तेजस्विनी चेहरा’ आणि मयुरी खैरे हिला बळीराजा सन्मान प्रदान करण्यात आला.