भीषण आगीने नावडे गाव हादरले

1392

गिरीश भोपी :

पनवेल :- तळोजा येथील नावडे गावात बेकायदा असलेल्या टायर गोडवूनला सकाळी ११.१५ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली  या आगीत भंगारातील साठवणूक केलेल्या टायरचा साठा जळून खाक झाला.

    तळोजा औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असलेल्या नावडे गावात झालेल्या या आगीच्या घटनेनंतर
 तळोजा पोलीस व अग्निशमन दल घटना स्थळी दाखल होऊन आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयन्त करताहेत .
   नावडे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात लाकडी पाट , भंगार , प्लास्टिक , टायर यासारखे बेकायदा गोडाऊन थाटले गेले आहेत त्यामुळे वारंवार अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे . अशा भयानक प्रकारच्या घटना घडून देखील येथील येथील प्रशासन ठप्प आहे. असा अनाधिकृत व्यवसाय करणारे , गोडावून असणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
   याबाबत आमच्या प्रतिनिधीने स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो झाला नाही.