कामोठ्यात सामूहिक भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन व राष्ट्रगीताचे गायन !

964

गणेश शिंदे प्रतिनिधी ,कामोठे /पनवेल

एकता सामाजिक संस्थे तर्फे कामोठ्यात सेक्टर 36 मध्ये सामूहिक भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचन व राष्ट्रगीताचे गायन यशस्वी आयोजन करण्यात आले.
सद्य स्थितीत देशातील बिघडत चाललेले धार्मिक वातावरण व कमी होत चाललेले धार्मिक सलोखा ह्याच विषयाची गांभीर्यात  लक्षात घेऊन एकता सामाजिक संस्थे तर्फे भारतीय संविधानाची प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करुन नागरिकांना आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच इमारती मधील लोकांना मैदानात आणून सामूहिक राष्ट्रगीत गाण्यात आले. कामोठयतील नागरिकांनी उत्फुर्स प्रतिसाद दिल्याने नागरिक, महिला व लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ह्यावे माजी सैनिक श्री देशमुख व भारतीय जवान अमोल पारंडे व आता सध्या रुजू असलेलं श्री राजकुमार लिंगे ह्यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात माजी सैनिक देशमुख ह्यांनी सैनिकांचे आयुष्य व त्यांचे मेहनत ह्यावर भाष्य केले.
जे उद्यानात कार्यक्रम झाला ते उद्यान पमापचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे ह्यांनी स्वखर्चातून बांधले आहे त्याची योग्य ती देखभाल करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच उपस्थित असलेल्या जवानांचे देखील त्यांनी आभार मानले.
तसेच कार्यक्रमाला नगरसेवक हेमलता गोवारी, प्रमोद भगत, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू, शंकर म्हात्रे, भाऊ भगत, रवी गोवारी, अर्जुन डांगे तसेच एकता सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे, मंगेश अढाव, बाप्पू साळुंखे, जयकुमार डिगोळे, अल्पेश माने, रवींद्र जाधव, प्रशांत कुंभार, दशरथ माने, गणेश शिंदे, अजिनाथ सावंत, गौरव जहागीरदार, राजकुमार लिंगे, मोहन जोशी, बलवंत कौशल,सुरेंद्र सिंग, नचिकेतन सिसोदिया आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.