झी टॉकीजवर २७ जानेवारी ला अवतरणार’ मराठी तारका’

1155

अनिल चौधरी,पुणे 

झी टॉकीज ही वाहिनी मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी आहे जी  एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. झी टॉकीज वर अनेक गाजलेले आणि नवीन चित्रपट आणि त्याचबरोबरसंगीत , नृत्य आणि विनोदाने भरलेले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम दाखवले जातात . महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ? हा अतिशय मानाचा चित्रपट सृष्टीचा अवॉर्ड् सुद्धा झी टॉकीजवर दाखवला जातो .   यावर्षी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी मराठी तारका हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करत आहे.

महेश टिळेकर यांनी गेल्या ११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींना एकत्र आणून मराठी तारका सारखा उत्तम कार्यक्रम उभा केला. ‘मराठी तारका’ या गीत-संगीत नृत्याच्या कार्यक्रमाने तमाम मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन अनेक वर्षे केलंआहे. मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम देशविदेशात गाजलेला कार्यक्रम आहे . या कार्यक्रमाचे आजपर्यंत ५०० हून अधिक शोज झाले आहेत. नुकताच हा सोहळा अंधेरीमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यासोहळ्याला बॉलिवूडची दिवा कंगना राणावत, सारा अली खान आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्यासह बॉलीवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्री रती अग्निहोत्री, वहिदा रहमान, हेलन, जया प्रदा, अरुणा इराणी , झीनत अमान आणि शुभाखोटे, त्याच बरोबर मराठी मधील नावाजलेल्या  अलका कुबल, पूजा पवार या अभिनेत्रींनी सुद्धा उपस्थिती दाखवली . मराठी सिनेमा मधील सुपर हिरो अमेय वाघ आणि छोट्या पडद्यावरून घराघरामध्ये पोहोचलेला  अभिनेता अभिजीतखांडकेकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय उत्तमरीत्या सांभाळले . या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात गायिका सावनी रवींद्र हिच्या सुमधुर आवाजात गणेशवंदन करून झाली . आपल्या निरागस रूपाने सगळ्यांना मोहूनटाकणारी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने तिच्या ‘ग साजणी’ या गाण्यावरील नृत्याने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं तर दुसरीकडे अभिनेत्री श्रुती मराठी हिने तिच्या रोमांचक परफॉर्मन्सने सगळ्यांना घायाळ केले. अभिनेत्री संस्कृती बालगुडेही माधुरीच्या गाण्यांवर थिरकली. सर्व मराठी तारकांचा सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी या कार्यक्रमाची कोरिओग्राफी केली.

एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि कंगना राणावत या दोघींनी मराठी गाण्यावर सुंदर ठुमके दिले आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला त्यानंतर अभिनेत्री रेखा  यांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्व तारकांनाआलिंगन दिले.

सारा अली खान आणि सरोज खान यांनी मराठी तारकांसोबत स्टेजवर २ स्टेप्स परफॉर्म केल्या. आणि त्याचबरोबर सारा अली खान हिला मराठी खाद्यपदार्थमध्ये पुरणपोळी अतिशय आवडते ह्याची तिने कबुली दिली . याकार्यक्रमाच्या सुंदर मराठी तारका वर्षा उसगावकर, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी, तेजा देवकर, मधुरा देशपांडे, सायली पाटील, वैष्णवी पाटील, नुपूर दैठणकर, स्नेहा चव्हाण यांनी देखील त्यांच्या नृत्याने सगळ्यांचे  मनोरंजन केले . हा आणि यासारखे असंख्य आवडते कार्यक्रम झी टॉकीज वाहिनीवर वर बघत राहण्यासाठी ३१जानेवारीच्या आधी लाँच ऑफर मध्ये फक्त ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’   नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजनकरण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील आणि मराठी तारका हा बहारदार कार्यक्रम  झी टॉकीज वर रविवार  २७ जानेवारीला दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.