Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रसूर्यनमस्कार ग्रुपची तोरणा किल्ल्याला भेट

सूर्यनमस्कार ग्रुपची तोरणा किल्ल्याला भेट

अनिल चौधरी, पुणे 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. तरुण वर्ग अधिकाधिक व्यसनाधिन होत चालला आहे. याला अपवाद म्हणजे कोंढव्यातील सूर्यनमस्कार ग्रुप . सूर्यनमस्कार ग्रुपचे सर्व सभासद न चुकता कोंढवा भागातील अब्दुल हमीद उद्यानात रोज सकाळी व्यायाम करत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी गड किल्यांची भ्रमंती ते करत असतात. प्रसंगी गड किल्ल्यांवर साफसफाई करत असतात. आतापर्यंत या ग्रुपच्या सभासदांनी  महाराष्ट्रातील जवळपास सर्व किल्ल्यांची भ्रमंती केली असून प्रंसगी त्या ठिकाणी साफसफाई , स्वच्छता  देखील केली आहे. तसेच हा ग्रुप सर्व वयोगटातील नागरिकांना व्यायामाचे महत्व पटवून देत असून अधिकाधिक नागरिकांनी रोज जसा जमेल तसा व्यायाम करावा असे प्रबोधन ते करत असतात.

भरत टोपें , सतीश लोणकर, हेमराज भोईर, शंकर गोते,क्षीरसागर, हनुमंत लोणकर, संजय बाबर, धनंजय पडवळ, राजू परदेशी , मुळे,दादा रणदिवे, धोत्रे आदी तसेच इतर सभासद हे नेहमीच व्यायामाचे महत्व पटवून देत असतात तसेच गड किल्ल्यांवर श्रमदानाने स्वच्छता करण्यात अग्रेसर असतात . २६ जानेवारी रोजी या ग्रुपच्या सभासदांनी तोरणा किल्ल्याला भेट देऊन तेथे श्रमदान करून राष्ट्रीय संपत्तीचा ठेवा अजून सुरक्षित ठेवण्याचे काम केले. 

   तोरणा किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती 

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापना करताना पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्याचे तोरणा असे पडले,तसेच या किल्ल्यावर अनेक तोरणा ची झाडे असल्याने ही याला तोरणा किल्ला नाव पडले , या किल्याची पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्याचे प्रचंड विस्तार व भव्यता पाहून याचे प्रचंडगड असे नाव ठेवले.पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला,शंकराजी नारायण सचिवांनी पुन्हा लढाई करून पुन्हा हा किल्ला मराठी साम्राज्यात आणला नंतर औरंजेबाने 1704 मधे हा किल्ला ताब्यात घेतला पुन्हा चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर चढाई करून पुन्हा मराठी साम्राज्यात आणला व शेवट पर्यंत हा किल्ला मराठी साम्राज्यात राहिला अतिशय दुर्गम सह्याद्री च्या रांगेत हा किल्ला असून मजबूत तटबंदी, गडावर पाण्याच्या टाक्या मेंगाई देवीचे मंदिर, दुर्गम अशी झुजांर माची, बुधला माची व कानद नदिच्या खोर्यात विस्तारलेला हा किल्ला चढून जाताना थरारक अनुभव येतो ,काही ठिकाणी माणसाच्या ऊंची येवढे सुळके चढून गेल्यावर किल्ला उतरताना मात्र धडकी भरते प्रत्येक तरूनाने हा किल्ला येकदा तरी चढून जावा म्हणजे कळते कि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी किती खडतर परिस्थितीतून मार्ग काढत हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!