जाणीव फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्वछता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

885

रायगड प्रतिनिधी :- गिरीश भोपी 

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुकापूर मधील  सामाजिक कार्यकर्त्यांनी जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या परिसरात साफसफाई करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो हा विचार घेऊन जाणीव फाउंडेशनच्या कार्यकर्त्याने स्वत: आपल्या हातात झाडू घेऊन परिसारातील सार्वजनिक रस्ते , भिंती  यांची साफसफाई केली.
              जाणीव फाउंडेशन सामाजिक कार्यकर्त्यांची  हि साफसफाई ची मोहीम पाहून यामध्ये नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यामध्ये काही महिला मंडळे हिसहभागी होऊन त्यांनी देखील परिसरातील सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई केली तसेच आपण रस्त्यावर कचरा फेकणार नाही आणि इतरांनाही फेकू देणार नाही अशी शपथ यावेळी महिला तसेच कार्यकर्त्यांनी घेतली. सार्वजनिक स्वच्छता राहिली तर कोणालाही आजारपण येणार नाही त्यामुळे परिसर देखील स्वच्छ राहून आरोग्य उत्तम राहते , असा संदेश यावेळी जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी व्यक्त केला.याप्रंगी परिसरातील मराठी शाळेतील विद्यार्थी, किड्स गार्डन शाळेच्या विधार्थांना तसेच परिसरातील नागरीकांना  सोबत घेऊन एक स्वछता फेरी देखील काढण्यात आली . नागरिकांकडून या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले तसेच यापुढे आम्ही सार्वजनिक रस्त्यावंवर घाण होऊ देणार याची काळजी घेऊ असे येथील नागरिकांनी आश्वासन दिले.