क्षारयुक्त, क्षारकर्म मुळव्याध उपचाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

1706

डॉ.शर्मिला कामठे आणि डॉ.कुणाल कामठे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र व सुवर्णपदक देताना डॉ.माने.

अनिल चौधरी, पुणे

मुळव्याध मुक्त भारत हा उद्देश ठेवून डॉ.कामठे पाईल्स क्लिनिकतर्फे सलग ११ तास ५मिनिटे आयुवैदिक पद्धतीने केलेल्या क्षारकर्म, क्षारयुक्त या उपचार शिबाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.यावेळी मुळव्याध तज्ञ डॉ.कुणाल कामठे यांसह विविध भागातून आलेल्या तज्ञ डॉक्टर्सकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले.डॉ.कामठे आणि त्यांचे सहकारी यांची या अनोख्या उपचार शिबिराबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.       डॉ.कामठे पाईल्स क्लिनिकतर्फे मुळव्याध,फिशर, भगंदर या आजारावरील क्षारयुक्त, क्षारकर्म या आयुवैदिक उपचाराच्या भव्य शिबिराचे आयोजन कोंढवा येथील चंद्रा नर्सिंग होम येथे करण्यात आले होते.संपूर्ण महाराष्ट्रातून या उपचाराकरिता आलेल्या २०८ रुग्णांवर वैद्यकीय तज्ञ डॉक्टर्सकडून हे उपचार करण्यात आले.यावेळी डॉ.कुणाल कामठे आणि डॉ.शर्मिला कामठे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक डॉ.दिलीप माने यांनी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. मुळव्याध क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉ.ज्ञानेश निकम (नाशिक), डॉ.डॉ.शिव गोरे (औरंगाबाद), डॉ.एम.पी.राजा (हैदराबाद), डॉ.सुर्यकांत मुरुड, डॉ.सार्थक पवार, डॉ.गौरव शर्मा, डॉ.विजय पोटफोडे, डॉ.नितीन कात्रे, डॉ.हेमंत इंगळे, डॉ.सुशांत देशमुख, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते डॉ.मिलिंद भोई,  डॉ.निखील खंडेलवाल, डॉ.अनिल मनुरे, डॉ.दीप्ती चव्हाण, डॉ.अशोक देशमुख या डॉक्टरांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.   इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक डॉ.दिलीप माने म्हणाले, आतापर्यंत अशा रेकॉर्डची कुठेही नोद नाही. त्यामुळे आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच आयुर्वेद जनमानसात रुजविण्यासाठी याचा सामाजिक हितासाठी नक्की उपयोग होईल. डॉ.मिलिंद भोई  म्हणाले, वैदकीय क्षेत्रात विश्वविक्रम फार कमी प्रमाणात होतात.या विक्रमाची नोड झाल्याने मुळव्याध आजाराविषयी लोकांची मानसिकता नक्कीच बदलेल.मुळव्याध आजारावर लोक आयुर्वेद उपचार घेतील.                                                                                                                             पुरस्कारप्राप्त डॉ.कुणाल कामठे म्हणाले,  मुळव्याध, फिशर, भगंदर हे आजार अनेकदा दुर्लक्षित केले जातात.या आजाराविषयी अनेक गैरसमज असतात.त्यामुळे उपचार करुन  घेण्यास रुग्ण लाजतात. या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत तसेच उपचाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुळव्याध मुक्त भारत हा यामागील मुख्य उद्देश होता.