वानवडीतील शिपयार्ड हॉटेलवर अतिक्रमण कारवाई

842

मल्हार न्यूज विशेष :-

वानवडी परिसरातील शिपयार्ड हॉटेलवर आज पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई करुन अंदाजे २५०० स्वे. फुटाचे बांधकाम पाडण्यात आले . यावेळी या कारवाईला हॉटेल प्रशासनाने विरोध केला होता.                            वानवडी परिसारातील शिपयार्ड हॉटेल येथे अनाधिकृत बांधकाम केलेले होते व त्याठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरु केला होता. याबाबत पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाने ऑगस्ट २०१८ मध्येच हॉटेल प्रशासनाला नोटीस दिली होती. तरीही याठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरु होता. परंतु हॉटेलचे मालक रमेश भंडारी यांनी आपण सन २००८ पासून नियमितपणे पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरत असून आणि सदर बांधकामाचा नकाशा मंजूर आहे, तसेच आपल्याला आतापर्यंत कुठलीही नोटीस मनपा प्रशासनाकडून मिळालेली नाही आणि सदरची कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगितले.                                                                                                                                    याप्रकरणी अतिक्रमण अधिकारी मुटूकले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सदर अतिक्रमणाची नोटीस ऑगस्ट २०१८ कलम ५३अ नुसार दिलेली असून बांधकामाचा नकाशा फक्त पालिकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.             सदरची कारवाई पुणे मनपाच्या दोन गॅस कटर, १जेसीबी, १०कर्मचारी, एक मुकादम तसेच अतिक्रमण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विकास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपनिरीक्षक, १५ पोलीस कर्मचारी यांनी सयुंक्तपणे केली.