कोंढव्यामध्ये बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

1879
भूषण गरुड , पुणे 
कोंढव्यात मिठानगर भागात आई वडील घरी नसल्याची संधी साधत बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी रईस रफिक शेख (वय 22) या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई-वडील सोमवारी सकाळी कामाला गेले. पीडित मुलगी पोट दुखत असल्या कारणाने शाळेत गेली नाही घरी एकटीच आराम करत होती या संधीचा फायदा घेत. आरोपी रईस शेखने तिच्यावर अत्याचार केला. पीडिताच्या आईला शेजारीच राहणाऱ्या तिच्या भाचीने फोन करून सर्व माहिती सांगितली. तसेच पीडीताच्या आईने महिला पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आरोपी रईस शेखने मुलीवर अतिप्रसंग केल्याची माहिती दिली.
कोंढवा पोलिसांना माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गोपाळ दाबाळे, पोलीस शिपाई हर्षल मांढरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत आरोपी रईस शेख यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही.पी.सज्जन तपास करत आहेत.