युवा दिग्दर्शक किशोर लोंढे याचा ‘द कॅप्टिविटि’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये प्रथम

1597

अनिल चौधरी,पुणे :-                                                                                                                          पुण्याच्या किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या आजच्या पत्रकारितेवर आधारित ‘द कॅप्टिविटि’ या लघुपटाने प्रिश्टिना कोसोवा (यूरोप) येथे आयोजित करण्यात आलेल्या लाईफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल  मध्ये  द बेस्ट शॉर्टफिल्म विभागामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. किशोर हा मुळचा वेणेगाव (ता. माढा) येथील आहे.                         प्रिश्टिना कोसोवा (यूरोप) येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ९२ देशातून ९०० लघुपटांनी  सहभाग घेतला होता, त्यातील ७२० लघुपटांमधून उत्कृष्ट सहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘द कॅप्टिविटि’ या एकमेव लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. या एक मिनिटाच्या लघुपटामध्ये, लोकशाहीचा एक मजबूत आणि प्रभावी आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेची अलीकडच्या काळातील​ अवस्था तसेच राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर  हिरावून घेतलेलं पत्रकारितेचं स्वातंत्र्य हे  प्रखरतेने दाखवण्यात दिगदर्शक किशोर लोंढे यांना यश आले आहे. या लघुपटातून अप्रत्यक्ष रित्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती वर भाष्य केले गेले आहे. आत्ता पर्यंत युरोप, अमेरिका,इटली, रशिया, आफ्रिका या ठिकाणच्या अनेक अंतरराष्ट्रीय लघुपट मोहत्सवात हा लघुपट दाखण्यात आला असून बऱ्याच आंतरराष्ट्रीय  मोहत्सवात या लघुपटाने अंतिम फेरी गाठली आहे.                                  ‘द कॅप्टिविटि’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी​ केले असून निर्मिती  अविनाश लोंढे यांनी केली आहे. किशोर लोंढे हा एमबीए पदवीधर असून आपली चित्रपट निर्मिती ची आवड जोपासण्याचा निर्णय घेत दिग्दर्शनात यश मिळविले आहे. या अगोदर किशोरची ‘आझाद’ही शॉर्टफिल्म खूप गाजली होती. ग्रामीण पार्श्‍वभूमी असल्यामुळे सामाजिक लघुपट बनवून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न किशोर आणि त्याचे सहकारी करीत आहेत. किशोर ने आजवर आझाद, जन्मजात अशा यशस्वी लघुपटाची निर्मीती आणि दिग्दर्शन केले आहे. द कॅप्टीव्हीटी हा त्याचा तिसरा लघुपट ही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरला आहे.                                                                                        प्रिश्टिना कोसोवा येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाचा प्रतिनिधीत्व करण्याचा मान तसेच प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंदी आणि समाधानी असल्याचे किशोर लोंढे याने सांगितले