कोंढवा बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

825
भूषण गरुड पुणे
कोंढवा महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या पथकाने कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर 61 व 62 मधील पाच हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 53(1) अन्वये संबंधितांना प्रत्येकी नोटिसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती. सदर बांधकाम सर्वे नंबर 61 मधील बालाजी कॉम्प्लेक्स बिल्डींगच्या फ्लॅट नंबर 101 मध्ये लोखंडी गर्डर टाकून केलेले बांधकाम तसेच सर्वे नंबर 62 मधील मांडोत टॉवर बिल्डींग समोरील व बिल्डींग मधील गोकुळ हॉटेलच्या साईड शेडच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईवेळी पीएमआरडीएची पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, कार्यकारी अभियंता नामदेव गंभीर, उप-अभियंता कैलास काळले, सहाय्यक अभियंता गिरीश लोंढे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बंदोबस्ताच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली.