भूषण गरुड, पुणे / कोंढवा
कोंढवा परिसरातील मिठानगर मध्ये आर्थिक वादातून दोन गटामध्ये शनिवार दुपारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गोळीबाराची घटना भर दिवसा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली.
मिठानगर गल्ली नंबर 42 मध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. आर्थिक कारणाच्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाला. या घटनेमध्ये वीजय गूप्ता(वय 23, मीठानगर) गोळी लागून,सँमसंग दास (वय 24, मीठानगर)दगडाचा मारा लागून गंभीररित्या जखमी झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर गोळीबार करणारे फरार झाले.
पोलिसांनी फरार आरोपी शारूख जावेद खान(वय 22, मिठानगर), सलमान जावेद शेख(वय 25, मीठानगर), शहाबाद शरीफ शेख(वय 24, अशरफ नगर) यांना अटक केली.
कोढंवा पोलिसांनी पोलिस ठाण्याचे वरीष्ट पो.नी. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत आरोपीनां पकडून त्यांच्यावर गून्हा दाखल करून अटक केली. कोंढवा पोलिस तपास करत आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी यांनी आरोपीना त्वरित अटक केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.