दोन सराईत गुन्हेगार तडीपार : खडक पोलिसांची कारवाई

1082

अनिल चौधरी, पुणे                                                                                                                आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात पुणे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या टोळीचा, गुन्हेगारांचा समूळ नायनाट करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध कडक व ठोस कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या आदेशानुसार पुणे शहरातील सराईत गुन्हेगार नितीन शिवाजी कसबे, वय ३२ रा. स.नं.३, रल्वे क्रॉसिंग जवळ, हडपसर यांस पुणे शह्रर आणि जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.                                                                                                            त्याच्यावर खडक पोलीस स्टेशनच्या व पुणे शहरात मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून धार्मिक भावना दुखविणे,गंभीर दुखापत करणे असे एकूण साथ गुन्हे दाखल आहेत.तसेच यापूर्वी त्यास २००८ मध्ये दोन वर्षे तडीपार करण्यात आले होते. यानंतरही त्याच्या वर्तुणुकीत काहीही सुधारणा झाली, नाही . याबाबतचा प्रस्ताव परिमंडळचे एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे तडीपाराचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

   दुसरा सराईत गुन्हेगार आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पाठोळे वय-२२, रा. अंजुमन मश्जीद पाठीमागे, भवानी पेठ यास पुणे पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

 त्याच्यावर खडक पोलीस स्टेशन व पुणे शहरात चोऱ्या, जबरी चोऱ्या, घरफोड्या यासारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी घरफोडीच्या तीन गुन्ह्यांमध्ये त्यास न्यायालयाने २०१८ मध्ये कैदेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत काही एक सुधारणा झाली नाही व आपले गुन्हेगारी, बेकायदेशीर कृत्ये चालूच ठेवली होती.                                                                                                                                       याबाबतचे प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी , विजयकुमार शिंदे (गुन्हे) , उपनिरीक्षक राकेश सरडे, महेश बारवकर, महेश कांबळे, दीपक मोघे, यांनी सदर कारवाईमध्ये भाग घेऊन प्रस्ताव तयार केला होता.