कोंढव्यातील विद्यमान नगरसेवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

1165

भूषण गरूड पुणे.
कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक अब्दुल गफूर पठाण हे मंगळवारी रात्री त्यांच्या कुटुंबियासोबत सोबत रेस कोर्स येथील टर्फ क्लब मध्ये नातेवाईकांचा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले असता. रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास त्यांना बाहेर बोलावून चार जणांनी अरेरावीची भाषा करत जबर मारहाण करण्यात आली. तसेच कमरेला हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी विद्यमान नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात सल्लाउद्दीन लियाकत, मैनुदिन सय्यद (आरोपींची पूर्ण नावे मिळाली नाहीत) व त्यांच्या साथीदारांन विरोधात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला.                                                                                   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील विद्यमान नगरसेवक अब्दुल गफूर पठाण हे मंगळवारी रात्री त्यांच्या कुटुंबियासोबत रेस कोर्स येथील टर्फ क्लब मध्ये नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले असता रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास मोबाईलवर अज्ञात इसमाचा फोन येऊन अरेरावीची भाषा करत त्यांना बाहेर बोलावून चार जणांनी मारहाण करत त्यांच्या कमरेला हत्यार लावून जीवे मारण्याची धमकी दिली. या चारही जणांची तोंड ओळख आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनाखाली करत आहेत.