प्रेमाशी संबधीत ”रोज डे” ने सप्ताहाची सूरवात

917
भूषण गरूड, पुणे
गुरुवारपासून म्हणजे 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरुवात होत आहे. प्रेमाशी संबंधित या सप्‍ताहाची सुरुवातच ‘रोज डे’ ने होत असते. गुलाबाला आपल्याकडे ‘फुलांचा राजा’ म्हटले जाते. अनेक प्रकारची सुंदर फुले असूनही गुलाबाचे महत्त्व वेगळेच असते. गुलाब केवळ तांबड्या रंगाचाच असतो असे नाही. अनेक रंगांचे गुलाब पाहायला मिळतात व त्यांचा एक वेगळाच भावही असतो.
लाल गुलाब एखाद्याला देणे म्हणजे आपल्या आयुष्यात त्या व्यक्‍तीचे स्थान खास असल्याचे दाखवणे. आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे असा लाल गुलाब असतो. हा गुलाब आपल्या आई-वडिलांना दिला किंवा प्रेयसी, पत्नीला दिला तरी त्याचा अर्थ प्रेम व्यक्‍त करण्याचाच असतो. सफेद गुलाब शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. एखाद्या रूसलेल्या, रागावलेल्या प्रिय व्यक्‍तीचा रूसवा काढण्यासाठी असा गुलाब देता येतो. पिवळा गुलाब हा मैत्रीचे प्रतीक आहे. रोज डे या दिवशी अनेक मित्रमैत्रिणी एकमेकांना हा गुलाब देऊन आपली मैत्रीची भावना व्यक्‍त करतात. गुलाबी रंगाचा गुलाब हा प्रशंसा, आनंद आणि कृतज्ञता यांचे प्रतीक आहे. एखाद्याविषयी आदर असेल तर हा गुलाब देतात. नारंगी गुलाब निरातिशय प्रेमाचे प्रतीक आहे. एखाद्या व्यक्‍तीविषयी सखोल भावना व्यक्‍त करण्यासाठी ‘पॅशन’ आणि ‘एनर्जी’चे प्रतीक असलेला हा नारंगी गुलाब देतात. जांभळा गुलाब अतिशय दुर्मीळ असतो. मात्र, पहिल्या नजरेतील प्रेम व्यक्‍त करण्यासाठी हा देता येतो! पीच रंगाचा गुलाब एखाद्या व्यक्‍तीचे सौंदर्य किंवा त्याचा नम्र वगैरे स्वभाव यांचे कौतुक करण्यासाठी दिला जातो.