प्रवीण तरडे यांना रोटरी क्लब कर्वेनगरचा “व्यावसायिक गुणवत्ता”पुरस्कार प्रदान

731

अनिल चौधरी,पुणे                                                दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना रोटरी क्लब कर्वेनगरचा “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार(व्होकेशनल एक्सलंस अवोर्ड),रोटरीच्या नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.                     तसेच रमेश परदेशी,प्रा.के.एच.पाटील,विजयमाला कदम,एस.ए कदम,श्री माने यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल श्रीफळ,मानपत्र,व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.कोथरूड येथील शंकरराव मोरे विद्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी कर्वेनगरचे अध्यक्ष शिरीष पुराणिक,सेक्रेटरी अशा अमोणकर,आकांक्षा पुराणिक,रो.मकरंद टिल्लू(रोटरी प्रांत सेवाप्रकल्प डायरेक्टर),रो.दिनकर पळसकर,मनीषा पुराणिक आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य,शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रश्मी कुलकर्णी यांनी शिक्षणाचा उपयोग फक्त करिअरसाठी नाही तर जीवन चांगले होण्यासाठी केला पाहिजे असे सांगितले.शिरीष पुराणिक यांनी बोलताना विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या व्यक्तींचा सन्मान व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.सत्काराला उत्तर देताना प्रवीण तरडे यांनी आपणही याच शाळेचे विद्यार्थी आहोत त्यामुळे येथे मिळालेल्या पुरस्काराने आनंद वाटला,विद्यार्थ्यांनी १० हा जीवनातील दिशा देणारा महत्वाचा टप्पा मानावा,व्यसनापासून दूर रहावे.व आई वडील यांना आनंद मिळेल असे वर्तन करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा केसकर यांनी केले.