ओबी व्हॅनवर हल्ला करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी ; विनोद पत्रे

844

मल्हार न्यूज प्रतिनिधी

पुण्यात पत्रकार भवन जवळ उभ्या असलेल्या टिव्ही9 च्या ओबी व्हॅनची काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली असून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, पोलिसांनी यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे असे म्हटले आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अशा वेळी पत्रकार, मीडियावर, पत्रकारांच्या गाड्या, ओबी व्हॅन वर हल्ले करणे योग्य नसून हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे , राज्य सचिव अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे, रवि कोपणार, जिल्हाउपाध्यक्ष अभिजित डुंगरवाल यांनी केली आहे.  यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क केला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून ओबी व्हॅन चे झालेले नुकसान हल्लेखोरांकडून वसूल करावे किंवा त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेत्यांकडून त्याची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे .  दरम्यान पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू करावा अशीही मागणी विनोद पत्रे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केली आहे.