ऍट्रोसिटी केसमधील मराठा आंदोलकांना अंतरिम जामीन मंजुर

814

गणेश शिंदे, प्रतिनिधी

२५ जुलैच्या महाराष्ट्र बंद रोजी झालेल्या हिंसक आंदोलनात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेल्या मराठा क्रांती मोर्चा, रायगड टीमच्या सदस्यांची बाजु खंबीरपणे लढवून त्यांना अटकपुर्व जामीन मिळवुन देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेल्या अॅड. समाधान काशिद यांच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील मराठा आंदोलकांना खोट्या अॅट्रोसिटी केस मध्ये  मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अंतरिम जामीन मंजुर झाला.                                                            मराठा क्रांती मोर्चातील मराठा तरुणांच्या जामीन व्हेरिफिकेशनची प्रोसेस पनवेल न्यायालयात चालु असतानाच हा मुद्दा अॅड. काशिद यांच्यापर्यंत पोहचला आणि वेळेत वेळ काढून काशिद यांनी ती केस हातात घेऊन त्यांचे मित्र अॅड सचिन हांडे यांच्या साथीने मराठा आंदोलकांना अंतरिम जामीन मिळवुन दिला.                                                  गेले दोन आठवडे ते मराठा  आंदोलक  चुकीच्या पद्धतीने दाखल झालेल्या अॅट्रोसिटी केस मध्ये अटक टाळण्यासाठी आणि जामीन साठी धडपडत होते.अखेर आज त्यांना सुटकेचा श्वास घेता आला. यावेळी मराठा आंदोलकांच्या वतीने अॅड.काशिद आणि अॅड सचिन हांडे यांचे आभार मानण्यात आले.