दुचाकी व चारचाकी वाहनांना आरसे नसलेने दंड

1003

भूषण गरूड पुणे :

पुणे सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनांना आरसे नसल्यामुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत या कारवाईचे प्रमाण अत्यंत नगण्य असून, एका दिवसांत सुमारे दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. हा गेल्या दोन वर्षांतील कारवाईचा उच्चांक आहे. आरसे नसल्यास २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. वाहनांची विक्री करताना दुचाकीला दोन आणि चारचाकी वाहनांना तीन आरसे लावलेले असतात. त्यानंतर वाहनचालक दुचाकीचे आरसे काढून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघातामुळे किंवा अन्य कारणांमुळे चारचाकी वाहनांचे तुटलेले आरसे पुन्हा बसविले जात नाहीत. वाहन चालविताना मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येण्यासाठी, हे आरसे महत्त्वाचे असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. वर्षभरात ५३० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यांत ६८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. 

  मात्र, तरीही आरसा उपयुक्तच शहरात सध्या हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हेल्मेटमुळे आजूबाजूचे किंवा मागून येणारे वाहन दिसत नाही, अशी तक्रार करण्यात येते. मात्र, हेल्मेट वापरणाऱ्यांना आरसे अत्यंत उपयुक्तच असल्याचे वाहतूक पोलिसांचे मत आहे. 
  मोटार वाहन कायद्याप्रमाणे नवीन वाहनांची नोंदणी करताना किंवा व्यवसायिक वाहनांचे पासिंग करताना संबंधित वाहनाला आरसे आहेत किंवा नाही हे तपासले जाते. आरसे नसल्यास नोंदणी किंवा पासिंग केले जात नाही. संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी