कश्मीर पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली

1437

गिरीश भोपी, प्रतिनिधी रायगड 

कश्मीर पुलवामा येथे सी.एस. आर.एफ. च्या जवानांवर हल्ला झाला त्याचा संपूर्ण देशातून तीव्र निषेध होत आहे. जगातली जी महान राष्ट्र आहेत त्यापैकी आपले हे राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रावर आक्रमणे झाली; परंतु आपल्या राष्ट्राने आतापर्यंत कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही. ती आपली संस्कृतीही नाही. परंतु दहशतवाद आतंकवाद यांनी प्रत्येक वेळी आपला देशच रक्तरंजित होत आहे. शेजारील राष्ट्रे वारंवार कुरघोडी करत आहे. 14 तारिखला झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील शेवटचा माणूसही रस्त्यावर उतरला आहे. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत याचे श्रेय यांनाच आहे. आपली संस्कृती महान आहे; परंतु 14 तारीखला काहीजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते आणि संध्याकाळी अशी काहीतरी भयानक बातमी मिळेल असे वाटले नव्हते. या बातमीने तर संपूर्ण देश हळहळला आहे. पनवेल जवळील आकुर्ली गावच्या निवासिनी एकत्रित येत या घटनेचा तिव्र निषेध केला. तसेच या घटनेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आकुर्ली गावचे सरपंच श्री. सचिन पाटील, पं. स.सदस्य श्री.भुपेंद्र पाटील, अपेक्षा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष श्री.नागप्पा पाटील, उपाध्यक्षा सौ.स्नेहा बांदकर, सचिव श्री.शशिकांत पवार,पोलीस बॉयस संघटनेचे अध्यक्ष श्री.सुधीर चाळके, श्री.गवई, श्री.सुर्वे, श्री.सिद्धेश सुळे, अपेक्षा कॉम्प्लेक्स, पनवेल पॅराडाईज, मातेश्वरी कॉम्प्लेक्स, साई सपना सोसा., साक्षी पार्क सोसा. वरदविनायक सोसा. या सोसायटीचे व आकुर्ली गावातील मंडळी, तरुण गणेश मित्र मंडळ तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी काहीजणांना दुःख अनावर झाले. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जयहिंद फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्र पातळीवर अश्या शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मोलाचे कार्य करत आहे. या संस्थेच्या माध्यमातूनही महाराष्ट्रात काल अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन संचालन श्री.महेश अनपट व श्री.यशवंत बिडये यांनी केले होते.