आपला परिसर बालगुन्हेगार मुक्त करुया ; बिबवेवाडीत कार्यक्रमाचे आयोजन

741
भूषण गरूड पुणे
बिबवेवाडी पोलिस स्टेशन व गनिमी कावा युवा संघ संयुक्त आपला परिसर बालगुन्हेगार मुक्त समूपदेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.16 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 सुमारास अप्पर पोलीस चौकी मध्ये करण्यात आले.
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा निषेध करत शहीदाना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात करण्यात आली. पुणे शहरात आज पर्यंत जेवढी गंभीर गुन्हे घडले आहेत त्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा जास्त समावेश ही बाब अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलांना समाजातील काही समाजकंटक लोक स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी या मुलांच्या हातात घातक हत्यारे देऊन अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे न वळता शिक्षणाकडे कळावी यासाठी पालकांनी काय दक्षता घ्यायची आहे. व अल्पवयीन मुलांना समुपदेशन करून योग्य त्या मार्गाने त्यांच्या प्रगतीकडे कसे वाटचाल करता येईल याची माहिती पोलीस अधिकारी व उपस्थित मान्यवरांनी दिली.
परिमंडळ 5 विभागाचे पोलीस आयुक्त प्रकाश गायकवाड :-
परिमंडळ 5 विभागात प्रौढ गुन्हेगारांच्या संख्येपेक्षा बालगुन्हेगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अल्पवयीन मुलं वाईट संगतीमुळे गुन्हेगारीकडे वाटचाल करतात. गुन्हेगारी क्षेत्रात एकदा जर अडकले तर इच्छा असून सुद्धा बाहेर पडता येत नाही व पोलिसांचा ससेमिरा, न्यायालय या चक्रात त्याचे जीवन उध्वस्त होऊन जाते शेवटी तो समाजासाठी डोकेदुखी ठरतो. गुन्हेगारीमध्ये कितीही मोठा भाई गुन्हेगार असला तरी त्याचा अंत हा वाईटच असतो. पालकांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलांना पहिल्या वेळीच गुन्हा करताना अटकाव केला तर त्याचे जीवन उध्वस्त होणार नाही.
याप्रसंगी तरुणांना आवाहन करत जास्तीच जास्त तरुणांनी सैन्य,पोलीस व प्रशासन मध्ये येऊन समाजाची सेवा करावी.

बिबेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे :-
ज्या वयात मुलांच्या हातात पेन, पेन्सिल, वह्या-पुस्तकं, कॅम्पुटर असले पाहिजेत त्या वयामध्ये वाईट व्यक्तींच्या संगतीला लागून अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. पालकांनी योग्य वेळीच दक्षता घेतली तर अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत याची खबरदारी पालकांनी घ्यावी.
बिबेवाडी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र जाधव :-
अल्पवयीन मुले जन्मजात गुन्हेगार नसतात ते कुणाच्या तरी वाईट संगतीत येऊन गुन्हेगार बनतात. गुन्हेगार कितीही हुशार जरी असला तरी त्याच्या चारित्र्य पडताळणी मुळे पासपोर्ट व नोकरी मिळत नाही. पोलीस काका व भरवसा सेलच्या माध्यमातून नागरिकांनी गरज पडल्यास त्याचा उपयोग घ्यावा. अल्पवयीन मुलांनी काही वाईट कृत्य करीत असतील तर पालकांनी दडपण्या पेक्षा पोलिसांच्या निदर्शनास आणावे जेणे करुन शिक्षेच्या भितीने परत कधी अल्पवयीन मुले वाईट कृत्य करणार नाहीत.
बिबवेवाडी नगरसेविका रुपाली ताई धाडवे :-
पहिल्यांदाच परिसरामध्ये बाल गुन्हेगारी मुक्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी आभार व्यक्त केले व हा उपक्रम काळाची गरजच आहे. पालकांची जवाबदारी आहे की स्वतःची मुले कुठे जातात, कुठे राहतात, कुठे खातात कामधंदा न करता त्यांच्याकडे चांगले कपडे, चैनीच्या वस्तू कोठून येतात. याची चौकशी पालक म्हणून करणे गरजेचे आहे. महिला व बालकल्याण कमिटीचे सदस्य रूपालीताई धाडवे यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आठवी ते बारावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची मनपा शाळेत बालगुन्हेगार विषयाचे कार्यशाळा आयोजित केली जाते. परिसरामध्ये गुन्हेगारांना वचक निर्माण व्हावा यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. जेणेकरून सीसीटीव्हीचा भीतीमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी पोलीस यंत्रणा व आपण सर्वांनी प्रयत्नशील आहोत.
गनिमी कावा युवा सेवा संघ व बिबेवाडी पोलीस स्टेशन संयुक्त; आपला परिसर बालगुन्हेगार मुक्त करुया कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मध्ये परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, बिबवेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, बिबवेवाडी पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा राजेंद्र जाधव, नगरसेविका रुपालीताई धाडवे, महिला व बालकल्याण अधिकारी डी.एस.कुंटे यांनी मार्गदर्शन केले. गणीमिकावा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाला बिबेवाडी पोलीस स्टेशन व सर्व कर्मचारी विशेष सहकार्य लाभले.
Attachments area