भूषण गरुड पुणे.
बिबवेवाडी मध्ये बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गनिमी कावा युवा सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे व माजी नगरसेवक दिनेशभाऊ धाडवे यांच्यातर्फे सर्वधर्म समभाव या उद्देशाने बिबवेवाडीत सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलाल, फुलांची उधळण करीत शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत ढोल, ताशे असे विविध पारंपरिक वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. शाही मिरवणुकीमध्ये महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीची सुरुवात अप्पर जुना बस स्टॉप पासून ते बिबवेवीड पर्यंत सायंकाळी चार ते सात सुमारास बिबवेवाडी पोलिसांच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली.