राज ठाकरे शुक्रवारी कोंढव्यात

1331

अनिल चौधरी,

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार दि.22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता कोंढवा भागात येत असून ते स्व.राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई लर्निंग स्कुलचे भूमिपूजन त्यांच्या व रुख्मिनी बाळासाहेब लोणकर यांच्या हस्ते  पार पडणार असल्याची माहिती कोंढवा भागातील कार्यक्षम नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मल्हार न्यूजशी बोलताना दिली.
कोंढवा भागात नागरी वस्त्यांची वाढ झाली असून चांगले शिक्षण मिळणे कठीण झाले आहे.गोरबरीब मुलांना चांगल्या प्रतीचे उच्च व डिजिटल शिक्षण मिळण्यासाठी ई लर्निंग स्कुल होत आहे. यामुळे परिसरातील तसेच पुणे शहरातील मुलांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे ,सतीश शिंदे, शेखर लोणकर, बाळासाहेब कामठे, हसनभाई शेख, अमोल शिरस, सुप्रिया शिंदे, मा.नगरसेविका आरती बाबर, अमित लोणकर, आबा रोकडे, सनी जगताप तसेच मनसेचे नेते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील तसेच नागरिकांनी देखील या भूमिपूजन समारंभास मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात  आले आहे.