भाग्यश्री देसाई यांना कलागौरव पुरस्कार प्रदान

838

अनिल चौधरी,पुणे 

महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर आणि कै. नानासाहेब गोरडे वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पद्मश्री नामदेव ढसाळ कलागौरव पुरस्कार या वर्षी भाग्यश्री देसाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला. कवी, चित्रकार, अभिनेत्री, चित्रपट व नाट्य निर्माती अशा चौफेर भूमिका बजावणाऱ्या देसाई यांना हा पुरस्कार जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते देण्यात आला.

                  यावेळी भाग्यश्री देसाई त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, पद्मश्री नामदेव ढसाळ कलागौरव पुरस्कार मला दिल्याबद्दल मी महाराष्ट्र साहित्य परिषदचे मी विशेष आभार मानते. माझ्या कामाची तुम्ही देखल घेवून दिलेला हा सन्मान  माझ्या लेखनाच्या भविष्याला नवसंजीवनी देणारा असून आगामी काळात मी अजून दर्जेदार लेखन करणार आहे. देसाई पुढे म्हणाल्या पुरस्कार मिळणं ही कलाकारांना पाठीवर कौतुकाची थाप असते. पण या प्रोत्साहाने नवीन उमेद घेऊन यशाच्या अवकाशात उंच गवसणी घातली पाहिजे.

             यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखाचे अध्यक्ष संतोष गाढवे, मसापच्या कार्यअध्यक्ष सुनिताराजे पवार, शरद बुट्टे – पाटील, सदाशिव अमराळे, अॅड. सतीश गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गाढवे म्हणाले की महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखा नेहमी स्तुत्य कार्यक्रमांचे आयोजन करीत आली आहे आणि आगामी काळात देखील असेच कार्यक्रम आम्ही करणार आहोत. संतोष गाडवे यांनी सर्वांचे आभार मानले.