मी आचारसंहितेची वाट पाहतोय : राज ठाकरे

988

अनिल चौधरी/ मल्लिनाथ गुर्वे

प्रत्येक वेळी कुठेही आले की बोलले पाहिजे का सारखे बोलून लोकांना वीट येतो. आपण घरात सारखे बोलतो घरच्या लोकांना सुद्धा कंटाळा येतो, त्यामुळे मी बोलणार आहे. पण मी आचारसंहितेची वाट पाहत असून माझा तोफखाना तयार आहे. असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील कोंढवा येथील स्व. राजेंद्र बाळासाहेब लोणकर ई लर्निंग स्कुलच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केले. तर निवडणूक आल्यावर तोफखाना घेऊन येईल आणि तुम्हाला समजून सांगेल ज्यांची फाडायाची असेल त्यांची फाडेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोंढवा येथील स्व राजेंद्र बाळासाहेब लोणकर इ लर्निग स्कूलचे भूमिपूजन मनसे अध्यक्ष राज ठाकरे व स्वर्गीय राजेंद्र लोणकर यांच्या मातोश्री रुख्मिनी लोणकर , साईनाथ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका आरती बाबर, रूपाली पाटील, किशोर शिंदे, शेखर लोणकर, सतीश निवृत्ती लोणकर, नितीन कापरे, ह.भ.प. पंढरीनाथ लोणकर, उद्योगपती भाऊसाहेब पारगे, अनंता लोणकर, आबा रोकडे, सुप्रिया शिंदे, सतीश शिंदे, मुरलीधर लोणकर, कोंढवा खुर्द ग्रामस्थ तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मनसेचे प्रत्येक नगरसेवकाने चांगले काम केले असून या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले आहे. तसेच हे दोघेजण चांगले काम करीत आहे. त्यांना महाराष्ट्र ओळखत आहे. याचा अभिमान वाटत आहे. तसेच पुणे महापालिकेत मनसेचे 162 नगरसेवक निवडून आल्यावर चमत्कार घडवेल. पण तो तुम्ही चमत्कार घडवावा. असे आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी युवा वर्गाची मोठी गर्दी झाली होती. याप्रसंगी माजी नगरसेविका आरती बाबर यांनी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी केलेल्या कामांची माहिती दिली तर सूत्रसंचालन व आभार शेखर लोणकर यांनी व्यक्त केले.