अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाच्या खुनाची पनवेल शहर पोलीसांनी केली उकल; पाच आरोपी गजाआड

884

गिरीष भोपी, पनवेल : वार्ताहर 

पनवेल रेल्वे स्थानकालगतच्रा झुडपामध्ये सोमवारी आढळुन आलेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात तसेच याची हत्या करणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. अमरजीतसिंग पाल असे या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव असून त्याची हत्या त्याच्याच सहकाऱ्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गत सोमवारी सारंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पनवेल रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेतील झुडपामध्रे अंदाजे 25 ते 30 वयोगटातील तरुणाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील कमरेपासूनचा वरचा भाग आढळुन आला होता. सदर मृत धडालगतच्या प्लास्टीक गोणीमध्ये जळालेली राख व माती देखील आढळुन आली होती. त्यामुळे सदर तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन, ते तुकडे जाळून वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सदर धडाचा भाग ताब्यात घेऊन त्याच्या इतर अवयवांचा शोध घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 चे अशोक दुधे, सहा. पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विनोद चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. त्यामध्ये पोलीस उपनिरिक्षक सुनील तारमळे, ईशान खरोटे, देवीदास पालवे, पोलीस हवालदार विजय आयरे, रविंद्र राऊत, पो. शि. मिलिंद ठाकुर, सुनील महाले व हवालदार भानुदास मोटे, रविंद्र कोळी, दिलीप चौधरी, पो. ना. दिनेश जोशी, अमरदीप वाघमारे, पंकज पवार, राजेश मोरे, नैनेश पाटील, संजय फुलकर, अशफाक शेख, जेजुरकर, केशव शिंदे, यादवराव घुले, राहुल साळुंखे, सुनील गर्दनमारे, अजय कदम आदींचे पथक ठिकठिकाणी शोध घेत होते. मात्र पोलिसांना त्यादिवशी कुठलेच अवयव सापडले नव्हते. परंतु बुधवारी सकाळी सदर मृत तरुणाचा एक पाय त्याच भागात काही अंतरावर झुडपामध्ये आढळुन आला होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता, त्याठिकाणी अमरजीतसिंग पाल याचे ओळखपत्र सापडले. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या झुडपात आढळून आलेला मृतदेह हा अमरजीतसिंग पाल याचाच असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्या भावाला बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर सदरचा मृतदेह हा अमरजीतसिंग याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी अमरजीतसिंग रहात असलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या सोबतच्या पाचही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत अमरजीतसिंग याची हत्या त्यांनीच केल्याचे निष्पन्न झाले. रविवारी रात्री दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून अमरजीतसिंग याच्या पाच सहकाऱ्यांनी त्याची हत्या केल्राचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी पाचही मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी सुरु केली.