पुण्यात कर्णबधिर मुलांवर पोलिसांचा अमानुष लाठीमार

937

मल्हार न्यूज प्रतिनिधी, पुणे

शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात महाराष्ट्रातील  मुकबधीर कर्णबधीर विद्यार्थी व विद्यार्थीनींचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी  मोर्चा समाजकल्याण आयुक्त कार्यालयावर आला होता. परंतु या कर्णबधिर मूकबधिर विद्यार्थ्यांवर, महिलांवर, मुलींवर लाठीचार्ज करुन अमानुष मारहाण करण्यात आली.  विद्येचे माहेरघर असलेलल्या पुणे शहरात कर्णबधिर- मूकबधिर मुलांवर लाठीमार झाल्याने सर्व पुणेकर नागरिक या घटनेचा निषेध व्यक्त करून लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह समाजकल्याण मंत्र्यावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा