पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य; अरुण जेठली

771

पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही शक्य आहे, असा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर अमेरिका कारवाई करू शकते तर भारतालाही हे शक्य आहे असे विधान अरुण जेटली यांनी केले आहे. 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची मंजुरी सरकारकडून देण्यात आली आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून पुरता बदला घेतला. हवाई दलाने आकाशातून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्लात 350 दशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात हवाई दलाच्या सैनिकांना यश आले आहे. यानंतर भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पाकिस्तानच्या भारतातील घुसखोरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली, यावेळी तीनही सैन्यदलप्रमुखांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सौजन्य :- एबीपी माझा