राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीतर्फे कलेक्टर कचेरीवर मोर्चा

853

अनिल चौधरी,

पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी तसेच अतिरेक्यांवर कारवाईसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीतर्फे नेहरू मेमोरियल ते कलेक्टर कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्मधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आपण भारत सरकार तसेच भारतीय लष्करा सोबत आहोत असेहि ते यावेळी म्हणाले. याप्रंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सोहेल खान यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे नेते, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.