डॉक्टर असल्याचे भासवून वाहन चोरी करणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी शिताफीने केली अटक

908

भूषण गरुड पुणे

फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत तपास पथक पेट्रोलिंग करत असताना शाहरूख रज्जाक पठाण(वय 22, रा.सर्वे नंबर 257 बुवाची वाडी बनपुरी ता.पुरंदर, जि.पुणे) डॉक्टरच्या अँप्रन घातलेल्या वेशात परिसरात दुचाकी वाहने चोऱ्या करीत आहे. पोलीस तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून शिताफीने अटक केली.

फरासखाना पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व कर्मचारी हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना. पोलिस कर्मचारी शंकर कुंभार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली. शाहरुख रज्जाक पठाण(वय 22, रा.सर्वे नंबर 257 बुधाचीवाडी बनपुरी ता.पुरंदर, जि.पुणे) शहर व परिसरातून दुचाकी वाहने चोऱ्या करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फरासखाना पोलिस तपास पथकाने सापळा रचून आरोपीस शिताफीने पकडून तपास करता. तो लोकांना संशय येऊ नये म्हणून डॉक्टरचा अँप्रन घालून त्यावर नेम प्लेट लावत होता. तसेच ब्यागेत डॉक्टरांना आवश्यक असणारे साहित्य ठेवत होता. जेणेकरून पोलिसांनी किंवा नागरिकांनी त्याला हटकताच डॉक्टर आहे चोर नाही असे सांगून निसटता येईल किंवा चलाखीने चोरीचे वाहन घेऊन जाता येईल. चारचाकी वाहनाने जाऊन चोरलेली वाहने विक्री करीत असे. त्याच्याकडून पुणे शहर व परिसरातून एकूण 30 वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपीने चोरलेले 30 वाहने हस्तगत करून एकूण 24 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये 26 दुचाकी, 3 चारचाकी व 1 टेम्पो असा एकूण 27 लाख 25 हजार चे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच आरोपींने ज्यांना वाहने विक्री केली आहे.असा व्यक्तींना नोटीस देण्यात आले आहेत व इतर वाहनाबाबत तपास चालू आहे.

सदरची कारवाई, पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर रवींद्र सेनगांवकर, पोलिस उपायुक्त परिमंडळ – 1 पुणे सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नावंदे, फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी शिर्के, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा तसेच उपनिरीक्षक महेंद्र पाटील, बापूसाहेब खुटवड, केदार आढाव, पोलीस नाईक दिनेश भांदूगे, अमोल सरडे, विकास बोऱ्हाडे, शंकर कुंभार, सयाजी चव्हाण, विशाल चौगुले, हर्षल शिंदे, महावीर वलटे, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी, अमय रसाळ यांनी केली आहे.