म्हाडाच्या 4756 स्वस्त घरांची सोडत सुरू

814

अनिल चौधरी,पुणे

 म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4756 घरांची सोडतीची जाहिरात 2 मार्चला सुरुवात झाली असून अर्ज नोंदणी आज पासून असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आ.उदय सामंत, सभापती राजे समरजित घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील 4756 घरांसाठी अर्ज नोंदणी 2 मार्च पासून सुरु झाली आहे ,बँकेत अनामत रक्कमासहीत अर्ज भरण्याच्या शेवट 12 एप्रिल असणार आहे सोडत 3 में रोजी होणार आहे.

या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे(चाकण) येथे 648 सदनिका तसेच तळेगाव दाभाडे 638 सदनिका आहेत. सोलापुर येथे गट नं 238/1 , 239 करमाळा येथे 288 सदनिका आहेत.
सांगली येथे स.क्रं 215/3 सांगली 88 सदनिका आहेत. तर प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत एकूण 1662 सदनिका आहेत.

म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे(चाकण) येथे 1065 सदनिका आहेत. पिंपरी वाघिरे येथे 925 सदनिका आहेत तर दिवे सासवड येथे 95 सदनिका आहेत.
सांगली जिल्ह्यात 48 सदनिका आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बालाजीपार्क येथे 24 सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात 70 सदनिका आहेत. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 2237 सदनिका आहेत.

सर्व सामावेश गृहनिर्माण योजनेअंतर्गत 20 टक्के जागा आहेत.
यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कोंढवा, आंबेगाव, धानोरी, बावधान आणि बाणेर येथे एकूण 218 सदनिका आहेत.
तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील वाकड, राहटणी,दिघी, वडमुखवाडी, पुनावळे, रावेत, डुडुळ गाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली येथे 639 सदनिका आहेत म्हणजेच सर्व समावेश गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 857 सदनिका नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.

याप्रसंगी अधिक माहिती देताना आ.उदय सामंत म्हणाले, सर्व प्रकारचे कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत. कॅनरा बँकेसोबत आमचा करार झाला असून ते देखील ऑनलाइन पद्धतीने सर्व प्रकारचे कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत. यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप असणार नाही. आमचे म्हाडा अंतर्गत होणारी सर्व बांधकामे अतिशय चांगल्या दर्जाचे होत असून आम्ही येथून पुढे ग्राहकांना स्विमिंग पूल, जिम, सारख्या अत्याधुनिक सुविधा देणार आहोत. या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे एजेटाना थारा असणार नाही, जर कुणी असे काम करून देऊ म्हणत असेल तर आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना जेलची हवा खाण्यास पाठवू. मुंबईत अशा एजटाना जेल मध्ये पाठविले आहे. म्हाडाच्या कर्मचऱ्याना सातवा वेतन आयोग लागू केला असून तो पुढील महिन्यापासून त्यांना तो मिळेल. कर्मचाऱ्याच्या बदल्यांच्या बाबतीत पारदर्शकपणा आणून त्यांना विभागवार बदल्यांचे आयोजन केले आहे. जुन्या म्हाडाच्या वसाहतींच्या डागडुजीसाठी 50 कोटीचे बजेट आहे. पूर्वीच्या 30 वर्षीची लिज पद्धत बंद करायची असून आता ती 90 वर्षांची करायची आहे.
याप्रसंगी प्रास्तविक पुणे म्हाडाचे कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी केले तर म्हाडाच्या माहिती घाटगे पाटील यांनी दिली. यावेळी म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.