कोंढवा राजपूत समाज व करणी सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर  संपन्न

1133
मल्लिनाथ गुरवे, पुणे 
राजपूत समाज सेवा विकास मंच व राष्ट्रिय रजपूत करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सी आर पी एफ जवानांच्या  स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राजपूत समाज सेवा विकास मंच वतीने 2000 हजार विद्यार्थ्यांना पॅड, पेन पेन्सिल तसेच परीक्षेला लागणारे साहित्याचे वाटप नगरसेविका संगीताताई ठोसर यांच्या साह्याने करण्यात आले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांच्या साह्याने मार्गदर्शन करण्यात आले.राजपूत समाज सेवा विकास मंच हे नेहमी समाजाभिमुख कार्य करत असते.
 पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांच्या समरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल कोंढवा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी
राजपूत परिवाराने उत्तम प्रतीसाद दिला.
या शिबीराचे उदघाटन राजपूत समाज सेवा विकास मंचच्या सौ हेमलता परदेशी व नगरसेविका संगीताताई ठोसर आणि शिवसेना नेते  गणेश कामठे  यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिबिरात 127 रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन देशाप्रती व सैनिक प्रति रक्तदानातून देशप्रेम व्यक्त केले. संगीताताई ठोसर, हडपसर शिवसेना विभाग प्रमुख गणेश कामठे सुभाष परदेशी,करणी सेनेचे प्रदेश सचिव विलास कछवे, लक्ष्मण चव्हाण, दत्त मोरे, सौ पायल परदेशी, सुरेखा परदेशी,कंसिंग राठोड,चेतन परदेशी,सुधीर परदेशी, दत्ता घोडके , दीपक घरीरवाल व रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड , निखिल दसवडकर उपस्थित होते