महाशिवरात्रीनिमित्त संकट हरण मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी  

673

मल्लिनाथ गुरवे, पुणे 

कोंढवा येथील संकट हरण  महादेव मंदिरात मंदिरात हर हर महादेव’चा जयघोष करीत भाविकांनी  दर्शनासाठी मोठी  गर्दी  केली होती. मंदिर प्रशासनाने भाविकांची दर्शनासाठी उत्तम सोय केली होती.

  पहाटे होम हवन,अभिषेक झाल्यानंतर  दर्शनासाठी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले . मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी उपवासाची खिचडी, केळी , पाण्याची सोय करण्यात आली होती . यावेळी माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, लक्ष्मण लोणकर, संतोष गोरड, अक्षय लोणकर, अनिकेत लोणकर, अजीज शेख, ज्ञानेश्वर भोईटे, महेश आबा लोणकर, विलास कापरे, कैलास लोणकर तसेच कोंढवा खुर्द ग्रामस्थ तसेंच कोंढवा परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.