हडपसर येथे मंडप सजावटीच्या साहित्याला आग

643

भूषण गरुड पुणे.

हिंगणे आळी हडपसर येथे मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाले ही घटना दि. 4 मार्च रोजी पहाटे 6.30 सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. 4 मार्च रोजी पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास हिंगणे आळी हडपसर येथे मोकळ्या जागे मध्ये ठेवलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली.

घटनेची माहिती मिळताच हडपसर आणि कोंढवा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत वीस ते पंचवीस मिनिटात अग्नीवर नियंत्रण मिळवले. या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांना या आगीची झळ पोहोचून काही वाहनांचे नुकसान झाले.