” साथ दे तू मला” प्रेक्षकांच्या भेटीला

777

अनिल चौधरी, पुणे

मराठी सिरीयल आणि मराठी कुटुंब यांचं एक नवीन नातं तयार झालं आहे . मराठी चॅनेल्सवरील मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात . कधी पोटधरून हसवणारे तर कधी विचार करायला लावणारे असे विषय प्रेक्षकांसमोर मांडले जातात . ११ मार्च पासून अशीच विचार करायला लावणारी नवीन मालिका ” साथ दे तू मला” प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे . या मालिकेचा ट्रेलर सध्या स्टार प्रवाहवर प्रेक्षकांची उत्कंठता वाढवतो आहे .

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक जालिंदर कुंभार हे पुन्हा एकदा मनाला टोचणारा विषय घेऊन “साथ दे तू मला” या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहेत . विषेशम्हणजे या मालिकेची कथा हि फक्त प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी काल्पनिक आधार घेऊन रंगवलेली नाही तर जालिंदर कुंभार यांनी त्यांचे आयुष्यच यावेळी पडद्यावरआणले आहे . अर्थात त्यांच्याच रियल लाइफला त्यांनी रील लाइफ मध्ये उतरवले आहे .

२००३ पासून कलाक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आव्हानांना सामोरे जाताना २००८ मध्ये त्यांनी सर्वप्रथम स्वतंत्रपणे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कामकरायला सुरुवात केली . २००९ मध्ये झी मराठीवरील “अनुबंध” हि त्यांनी दिग्दर्शित केलेली पहिली मालिका…  “सरोगसी” सारखा विषय या मालिकेतून प्रेक्षकांपुढे आणण्याचेआव्हान त्यांनी पेलल… सई ताम्हणकर , भार्गवी चिरमुले , तुषार दळवी , स्मिता तांबे अशा नावाजलेल्या कलाकारांची साखळी या मालिकेपासूनच सुरु झाली . सई ताम्हणकरआणि स्मिता तांबे सारख्या कसलेल्या अभिनेत्री मराठी चित्रपट सृष्टीला मिळाल्या .

२०१० मध्ये गिरीजा ओक स्टारर “लज्जा” हि मालिका देखील अशाच एका विषयावर होती कि , जो विषय सामान्यतः मराठी घरांमध्ये चर्चिला जात नाही . तिची लाज हि संपूर्ण घराण्याची , समाजाची लाज असते पण ती लाज जपण्याची जबाबदारी हि केवळ तिचीच असते . जालिंदर कुंभार दिग्दर्शित या मालिकेत गिरीजा ओकसहमुक्ता बर्वे , नीना कुलकर्णी , विनय आपटे यांनीही कसदार अभिनय केले .

२०१४ मध्ये आलेल्या ” का रे दुरावा ” या मालकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले.  तीचं” आणि “त्याचं” नातं हे चार भिंतीत पती- पत्नीचं पण बाहेर केवळ एकाऑफिस कलीगचं … आजच्या जगात संसाराचा गाडा रेटण्यासाठी पतीच्या बरोबरीने नोकरी करणारी पत्नी अनेक भूमिका पार पडताना दिसते . हि कहाणी आज अनेकींचीआहे . पत्नी , मैत्रीण , सून , मुलगी अशा अनेक नात्यांना वेगवेगळ्या साच्यात बसवून निभावताना तिच्यासह “त्याची” देखील होणारी तारेवरची कसरत हि अनेक चवींनीसंसार चविष्ट करणारी असते . हि मालिकाही कधी हसवणारी , कधी रडवणारी , इर्षा , मत्सर , आपुलकी अशा अनेक भावनांनी रंगवलेली होती . “का रे दुरावा” या मालिकेला२०१५ सालच्या झी मराठी अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेसह ९ अवॊर्डस    मिळाले .“इ” टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका “कालाय तस्मै नमः” आणि “अनामिक” या मालिकांचे दिग्दर्शनाचे नामांकनही जालिंदर यांना मिळाले.   

आता पुन्हा एकदा अशीच एक कहाणी घेऊन लेखक दिग्दर्शक जालिंदर कुंभार प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी मालिका घेऊन येत आहेत . साथ दे तू मला यामालिकेच्या निमित्ताने ते सांगतात कि , हि केवळ मालिकाच नाही , तर यावेळी त्यांचेच स्वतःचे आयुष्य पडद्यावर ते स्वतःच दिग्दर्शित करीत आहेत . आयुष्याने अनेकउतार चढाव दाखवले . परिस्थितीने दिलेला प्रत्येक घाव “साथ दे तू मला” या मालिकेची चौकट बांधतात .एखाद दुसरं अपवाद वगळता ‘साथ दे तू मला’ मधील सगळ्याचव्यक्तिरेखा या माझ्या आयुष्यातील आहेत. आणि आजही माझ्या आसपास आहेत. काहींना मी ओळखतो, काहींना मी ओळखत नाही पण मी त्यांचा फॉलोअर आहे. काहींनातुम्ही आणि मी आपण दोघे ओळखतो…हो, तुमच्यातल्याही आहेत.काही माझ्या भूतकाळातील, काही वर्तमानातील. काही आता या जगात नाहियेत, काही अजूनही जिवंतआहेत. काहींनी त्रास दिलाय, काहींनी खूप मदत केली, खूप प्रेम केलं माझ्यावर. तुम्ही, मी, आपल्या सगळ्यांनाच आणलंय यावेळी कथानकात. इनफॅक्ट त्यांच्यामुळेच याकथेतलं जग उभं राहिलंय आणि हे असं माझ्याकडून पहिल्यांदाच घडतंय असं ते हणाले. जालिंदर कुंभार हे नेहमीच वास्तव आयुष्यावर भाष्य करणाऱ्या विषयांनाच प्रेक्षकांसमोर आणतात . आजच्या या सोशल मीडियाच्या लाईफमध्ये माणसंआयुष्य जगण्यापेक्षा, आला दिवस ढकलायचा कसा याचा विचार करण्यात वर्तमान गमावतात . पण आपल्या

लेखणीतून जालिंदर यांनी आयुष्यातलं माणूसपण”जगण्याला”  जगवण्याला” आणि “जागवण्याला” महत्व दिले आहे .” अनुबंध “” लज्जा ” , “का रे दुरावा” सारखेच “साथ दे तू मला” या मालिकेतून आपली रिअल लाइफत्यांनी रील लाइफ मध्ये उतरवून     पुन्हा एक समाजिक संदेश देऊन समाजाची मानसिकता बदलण्याचा घाट घातला आहे . कथानकातील बहुतेक घटना माझ्या आयुष्यातप्रत्यक्षात घडलेल्या असल्या , तरी नेमक्या कोणत्या घटनेमुळे कथा लिहावी वाटली ते 10 तारखेला सांगेन असे जालिंदर यांनी सांगितले . त्यामुळे नक्की असं काय घडलं? हेजाणून घेण्यासाठी हि मालिकापहावी लागेल. ” साथ दे तू मला “चा ट्रेलर सध्या झी मराठीवर मालिकाप्रेमींचे लक्ष वेधत आहे . अगदी काही सेकंदातच या मालिकेच्या गाभ्यातील एक नस प्रेक्षकांचीउत्कंठता वाढवते . सध्या लग्नासाठी बोहल्यावर उभे राहण्यापूर्वी “ती” देखील तिचे स्वप्न जगण्याचा अधिकार मागते … अगदी निरागस पणे संसाराची गोडी चाखताना , माझेही आयुष्य मनापासून जगाचे स्वप्न ती त्याला सांगते . हि त्याची आणि तिची कहाणी पुढे अनेक नात्यानं जन्म देते , आणि मग पुन्हा सुरु प्रवास आयुष्याचा … आजअनेकींचीच नाही तर प्रत्येक लग्नाळू मुला मुलीची हि कहाणी पाहायला विसरू नका ११ मार्च पासून सायंकाळी  ७ : ३० वाजता स्टार प्रवाह वर , ” साथ दे तू मला ” …