स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांनी दिला “पर्यावरण वाचवा,पृथ्वीचे रक्षण करा ‘चा सामाजिक संदेश

654

अनिल चौधरी, पुणे

हॅप्पी किड्स क्लबच्यावतीने  ” पर्यावरण वाचवा पृथ्वीचे रक्षण करा  ” हा सामाजिक संदेश वार्षिक स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांनी समाजास दिला . पुणे कॅम्प भागातील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे सदर्न स्टार आर्मी प्री प्रायमरी स्कुलच्या प्रिन्सिपॉल उर्वशी सहा उपस्थित होत्या . यावेळी हॅप्पी किड्स क्लबच्या प्रिन्सिपॉल लवीना रहेजा प्रदीप रहेजा अशोक रहेजा रिया रहेजा आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनामध्ये प्ले ग्रुप नर्सरी ज्यूनियर के. जी. चे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . सामाजिक संदेशामध्ये वृक्ष वाचवा पाणी वाचवा स्वछ भारत ओला कचरा सुका कचरा वीज वाचवा तसेच तीन आरमधील रिड्यूस रियुज व रिसायकल जनजागृतीपर  माहिती  देण्यात आली.