सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह कामाचे भूमिपूजन

1027

भूषण गरुड पुणे.

शुक्रवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रभाग क्र.38 अ मधील राजीव गांधीनगर बिबवेवाडी सर्वे नंबर 659 पार्ट एम पी साठी आरक्षित जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह उभारणे कामाचे भूमिपूजन व बालाजी नगर येथील कै. काशिनाथ धनकवडे प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

बिबेवाडी सर्वे नंबर 659 पार्ट येथील एम पी – 9 साठी आरक्षित असलेल्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूती गृह मान्य बांधण्यात येणार असून त्याचे क्षेत्रफळ 280.00 चौरस मीटर चे 5 मजले याप्रमाणे 1400.00 चौरस मीटर(15070.00चौरस फूट) बांधण्यात येणार आहे.
प्रभाग क्र.38 अ मधील राजीव गांधीनगर बिबवेवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूतीगृह बांधण्यात येणार्या कामांमध्ये लोवर ग्राउंड पार्किंग आणि 5 मजले उंचीची इमारत बांधण्यात येणार आहे.

सदर इमारतीमध्ये प्रस्तावित मजले :-
बेसमेंट – (पार्किंग – 3 कार, 12 स्कूटर,10 सायकली, 1 ॲम्बुलन्स), सेंट्रल ऑक्सिजन रूम, पाण्याची टाकी इ.
तळमजला – रिसेप्शन्स, वेटिंग, रेकॉर्ड रूम, 2 ओपीडी, ड्रेसिंग रूम, नर्सेस रूम, फार्मसी स्टोअर इ.
पहिला मजला – लेबर रूम, ऑपरेशन थेटर, रिकव्हरी रूम, नर्सेस रूम, अँनेस्टेशिया रूम, डॉक्टर रूम, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी इ.
दुसरा मजला – जनरल वॉर्ड 11, सेमी प्रायव्हेट 2 बेड, अँडमिन ऑफिस व मिटींग हॉल, नर्सेस स्टेशन इ.
तिसरा मजला – जनरल वॉर्ड 11 बेड, सेमी प्रायव्हेट 2 बेड, अँटेन्डेंट कॉटर, नर्सेस स्टेशन इ.
चौथा मजला – डॉक्टरांचे निवासस्थान 2 बेडरूम किचन 1 व नर्सेस कॉटर 1 बेडरूम किचन 2.
स्ट्रेचर व पॅसेंजर लिफ्ट, महिला व पुरुषांसाठी शौचालय अशा सुविधा असणार आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसूती गृह बांधण्यात एकूण प्रकल्पीय खर्च :-
स्थापत्य कामासाठी रु.400.00 लक्ष आणि विद्युत कामासाठी रु.100.00 लक्ष असे एकूण रु.500.00 लक्ष येणार आहे. याची तरतूद सन 2018 – 2019 मध्ये रु.50.00 लक्ष करण्यात येणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे :-
सदर हॉस्पिटल इमारतीचे काम केल्यामुळे शहरातील तसेच बिबवेवाडी, सुखसागर नगर, कात्रज परिसरातील गोरगरीब नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राची व प्रसूतीगृहाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सदरचा प्रकल्प अंदाजे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जागतिक महिला दिनावर भाष्य करता मी स्त्री व पुरुष भेद न करता फक्त समानतेवर विश्वास ठेवते. 365 दिवस मी महिला दिन म्हणून मानते.
अनेमिया आजारावर बोलताना या आजारात रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन अशक्तपणा येऊन कुपोषित बालके जन्माला येतात.अनेमिया हा आजार वंश परंमपरेचा(जेनेटिक) स्वरूपातील आजार आहे याची माहिती नागरिकांना दिली.
दत्ता धनकवडे पुण्याचे महापौर असताना या जागेच्या आरक्षणाचा सतत पाठ पुरवठा केला तसेच पुण्याचे अजितदादा पवार पालकमंत्री असताना या जागेवरील असलेले आरक्षणाचा विचार करत नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन या जागेचे आरक्षण एका दिवसात बदलले. दत्ता धनकवडे यांच्या प्रयत्नातून ही जागा नागरिकांच्या विकासासाठी उपलब्ध झाली. दत्ता धनकवडे सारखे कार्यक्षम नगरसेवक जर मला आणखीन मिळाले असते किती छान झाले असते. अशी कार्याची स्तुति केली.
विरोधकांवर टीका करताना विरोधकांनी केलेल्या कामाची जाहिरातबाजी कशी फसवी आहे हे नागरिकांना सांगितले. जे कामे करतात त्यानां जाहिरातबाजीची गरज नसते. जाहिरातबाजीवर होणारा खर्च टाळला तर तो खर्च सिलेंडर सबसिडी ग्राहकांना देऊन त्याच्या फायदा ग्राहकांना होईल.

या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी नगरसेवक प्रकाश कदम, माजी महापौर राष्ट्रवादी नगरसेवक दत्ता धनकवडे यांची भाषणे झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला व मान्यवराच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.