कोथरूड मधील मनपा शाळेत महिला दिन उत्साहात साजरा

1638

गणेश जाधव, प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्र.४७ जी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कोथरूड भागातील कर्तृत्वान महिला मा. नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, नगरसेविका वासंतीताई जाधव, नगरसेविका हर्षालीताई माथवड, सामाजिक क्षेत्रातील सौ.रुपाली मेहता, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दीपाली कोलते यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थिनी झाशीचे राणी, सावित्रीबाई फुले, सानिया मिर्झा, प्रतिभाताई पाटील, पी.टि. उषा, सिंधुताई सपकाळ आदी विविध वेशभूषा तसेच आभूषणे परिधान करून त्यांच्या व्यक्तिरेखा साकारून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली. तसेच विद्यार्थ्यांनी स्त्री जीवनावर आपली मनोगते व कविता सादर करून वाहवा मिळवली. ऐतिहासिक महिलांची कामगिरी दाखविणाऱ्या चित्रांचे माहिती सहित सुंदर प्रदर्शन शिक्षक व विद्यार्थ्यांनी आकर्षक सजावट करून त्याचे सुंदर सादरीकरण केले होते. आकर्षक रांगोळी, भित्तीपत्रके लावण्यात आली होती.


या वेळी मा. नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, नगरसेविका वासंतीताई जाधव, नगरसेविका हर्षालीताई माथवड, सौ. शुभांगी चव्हाण (प्रशासकीय अधिकारी), सौ.मनोरमा आवारे(सहाय्य्क प्रशासकीय अधिकारी), सौ. प्रतिभा खाडे( पर्यवेक्षिका), सौ. रुपाली प्रीतम मेहता, डॉ. दीपाली कोलते,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जाधव, दिनेश माथवड, शाळा सुधार समितीचे सदस्य प्रीतम मेहता , श्रीधर रायरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक वृंद मंगल क्षीरसागर (मुख्या.) राजश्री सावंत, साधना गायकवाड, अर्जुन देवकर, अंजली कुलकर्णी, वैशाली दोरगे, अनंत हारपुडे श्रीमंत राऊत, छाया कडू, पुजा पाटील, सुनिल मुळीक, गणेश मुजुमले, धनेश हगवणे, छाया भोयने, निर्मला सस्ते, प्रास्ताविक अनंता हारपुडे, सूत्रसंचालन सविता महाजन यांनी केले…