कॉलेज डायरी चित्रपटाचे कलावंतांनी वितरकाला धुतले

2346

अनिल चौधरी, पुणे

कॉलेज डायरी हा सिनेमा कॉलेज जीवनातील काळ्या बाजूवर बेतलेला हा सिनेमा … मराठीतील आजवरचा सर्वात डार्क सिनेमा म्हणून देखील याला संबोधता येईल … अगोदरच चित्रपटाला कोणतं प्रमाणपत्र द्यावं या विचारात कॉलेज डायरी चित्रपटाची तारीख दोन वेळा पुढे गेली होती …त्यानंतर अखेर चित्रपटाला सेन्सॉर मिळाला, प्रेझेंटर न मिळाल्याने
दिग्दर्शकाने जमीन विकून चित्रपट प्रदर्शित केला … वितरकाने थिएटर मिळवून देतो असे सांगून पैसे घेतले पण प्रत्यक्षात कमी थिएटर मिळाले, थिएटर वाढवून देण्यासाठी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली, त्यामुळे तणाव सहन न झाल्याने चित्रपटातील मुख्य अभिनेते विशाल आणि अविनाश यांनी वितरकाची भेट घेतली त्यात चर्चेदरम्यान वाद होऊन त्यांच्यात मारहाण झाली, याबाबदत दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांना समजले असता त्यांनी मध्ये पडत दोघांना शांत राहण्याचे आवाहन केले.

चित्रपटांत या दोन अभिनेत्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी पद्धतीची दाखवण्यात आली आहे, वैयक्तिक जीवनात देखील ते असेच असल्याचे झालेल्या प्रकारावरून सिद्ध होते …