Sunday, April 27, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीचित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रेडू’ची बाजी सर्वोत्कृष्ठ चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार मृणाल कुलकर्णीच्या हस्ते...

चित्रपदार्पण पुरस्कारामध्ये ‘रेडू’ची बाजी सर्वोत्कृष्ठ चित्रपट, दिग्दर्शनासह पाच पुरस्कार मृणाल कुलकर्णीच्या हस्ते वितरित

अनिल चौधरी,पुणे  –

नवोदित कलाकारांना प्रोत्साहनासाठी डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्पेâ आयोजित ९ व्या चित्रपदार्पण पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपटासह दिग्दर्शक, कथा विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावून ‘रेडू’ या चित्रपटाने बाजी मारली.
प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पुष्कर जोग, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, निर्माते वैभव जोशी, अभिनेता राहुल सोलापूरकर, प्रिती व्हिक्टर, सुनंदा काळुसकर मराठी चित्रपट परिवारचे निवृत्ती जाधव, राहुल सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
रेडू या चित्रपटासाठी दिग्दर्शक सागर वंजारी यांना गौरविण्यात आले. मंत्र चित्रपटासाठी सौरभ गोगटे आणि शिकारी चित्रपटासाठी सुव्रत जोशी यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचे पारितोषिक मिीळाले तर तृप्ती तोरडमल यांना सविता दामोदर परांजपे चित्रपटासाठी आणि गौरी किरण यांना पुष्पवक विमान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार हॉस्टेल डेजमधील भूमिकेसाठी विराजस कुलकर्णी आणि मंत्र मधील भूमिकेसाठी शुभंकर एकबोटे यांना मिळाला.
माधुरी चित्रपटातील भूमिकेसाठी संहिता जोशी हिने सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला. संजय नवगिरे यांची रेडू कथा सर्वोत्कृष्ठ ठरली तर फर्जद चित्रपटाच्या पटकथा आणि संवादासाठी दिग्पाल लांजेकर यांना पारितोषिक मिळाले. बबन चित्रपटाचे गीतकार सुहास मुंढे सर्वोत्कृष्ठ ठरले. तर याच चित्रपटासाठी ओंकार स्वरुप यांना गौरविण्यात आले.
नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये यु अ‍ॅन्ड मी अल्बम सर्वोत्कृष्ठ ठरला. अमिता घुगरी (सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायिका, रेडू), रणजीत माने (सर्वोत्कृष्ट वॅâमेरामन, चिठ्ठी), नेहा गुप्ता (सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य, रेडू), सर्वोत्कृष्ट संकलन मंत्र – सचिन पंडीत, सर्वोत्कृष्ट वेशभूषा हॉस्टेल डेज – मोहिनी ननावरे. सर्वोत्कृष्ट संगीतकार – साई पियुष – यु अ‍ॅन्ड मी, शशांक प्रतापवार – साहिबा, सर्वोत्कृष्ट गायक – सागर मोडक – तू नसताना, सर्वोत्कृष्ट गायिका रसिका सुनील – यु अ‍ॅन्ड मी, सर्वोत्कृष्ट गीतकार – अदिती द्रविड – झिलमिल यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट चित्रपट
रेडू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सागर वंजारी – रेडू
सर्वोत्कृष्ट अभिनेता
सौरभ गोगटे – मंत्र
सुव्रत जोशी – शिकारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
तृप्ती तोरडमल – सविता दामोदर परांजपे
गौरी किरण – पुष्पक विमान
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
शुभंकर एकबोटे – मंत्र
विराजस कुलकर्णी – हॉस्टेल डेज
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
संहिता जोशी – माधुरी
सर्वोत्कृष्ट कथा
रेडू – संजय नवगिरे
सर्वोत्कृष्ट पटकथा
फर्जंद – दिग्पाल लांजेकर
सर्वोत्कृष्ट संवाद
फर्जंद – दिग्पाल लांजेकर
सर्वोत्कृष्ट गीतकार
सुहास मुंढे – बबन
सर्वोत्कृष्ट संगीतकार
ओंकार स्वरुप – बबन
सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायिका
अमिता घुगरी – रेडू
सर्वोत्कृष्ट वॅâमेरामन
रणजीत माने – चिठ्ठी
सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य
रेडू – नेहा गुप्ता
सर्वोत्कृष्ट संकलन
मंत्र – सचिन पंडीत
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
हॉस्टेल डेज – मोहिनी ननावरे
सर्वोत्कृष्ट अल्बम
यु अ‍ॅन्ड मी – व्हिडीओ पॅलेस

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!