टाटा पॉवर सोलारने लाँच केले मोठ्या प्रमाणावरील निवासी रूफटॉप सोल्युशन

737

अनिल चौधरी,पुणे,

टाटा पॉवर सोलार या भारतातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जा कंपनीने तसेच टाटा पॉवरच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने पुण्यामध्ये संपूर्ण निवासी रूफटॉप सोल्युशन सुरू केले आहे. टाटा मोटर्सच्या मॅन्युफॅक्चुअरिंग इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख श्री. रोमेश कचरु, वाकोधर ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक श्री. सुमीत वढोकर, के आर ट्रेडर्सचे व्यवस्थापकीय भागीदार श्री. जे. नाथ, एमएसईडीसीएलचे मुख्य इंजिनीअर श्री. लक्ष्मीकांत तालेवार, एमईडीएचे प्रादेशिक इंजिनीअर श्री. महेश आव्हाड, एमईडीएच्या सोलार विभागाचे महा-व्यवस्थापक श्री. व्ही. डब्ल्यू. रोडे यांनी पुण्यातील निवासी रूफटॉप सोल्युशनचे उद्घाटन केले. यावेळी आणखी काही सरकारी अधिकारी तसेच कॉर्पोरेट उद्योगातील निर्णयकर्ते अशा प्रतिष्ठितांचीही उपस्थिती होती. निवासी रूफटॉप सोल्युशनमुळे २५ वर्षे ५०,००० रुपयांची वार्षिक बचत होईल असे अपेक्षित आहे.

टाटा पॉवर सोलारने दर्जेदार उत्पादने, जागतिक दर्जाची कस्टमाइझ्ड सोल्युशन्स तसेच विस्तृत सेवा देऊन ग्राहकांशी दृढ असे नातेसंबंध विकसित केले आहेत. यामुळे कंपनीचे ग्राहक अत्यंत समाधानी आहेत. टाटा पॉवर सोलारने भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि अवलंबून राहण्याजोगे रूफटॉप सोल्युशन आणले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वाहून घेतलेल्या टाटा पॉवरच्या निवासी रूफटॉप सोल्युशनमुळे डिझेल जनित्रांचा वापर कमी झाला आहे आणि पर्यायाने इंधनाची अधिक बचत झाली आहे. याशिवाय,ग्राहकांना आपल्या रिकाम्या छताचा उपयोग करून उत्पन्नाची संधी प्राप्त झाली आहे. लाभार्थींचा खर्च आणखी कमी व्हावा म्हणून या उपक्रमाला सरकारने सबसिडी दिली आहे. कंपनीचे आधीच भारतभरात १५०हून अधिक विक्री व सेवा चॅनल पार्टनर्सचे दमदार जाळे आहे. हे पार्टनर्स कंपनीच्या मौल्यवान ग्राहकांना वित्तसहाय्याचे पर्यायही पुरवत आहेत.

जगातील सर्वांत मोठे रूफटॉप सोल्युशन एका स्थळी यशस्वीपणे कार्यान्वित करण्याचा आणि भारतातील सर्वांत मोठे कारपोर्ट कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थापन करण्याचा अनुभव टाटा पॉवर सोलारकडे आहे. अलीकडेच टाटा पॉवरने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सहयोगाने जगातील सर्वांत मोठे सौरऊर्जेवरील क्रिकेट स्टेडिअम मुंबईत १०० दिवसांच्या विक्रमी कालावधीत स्थापन केले. टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीर सिन्हा या उपक्रमाबद्दल म्हणाले, “दिल्ली, मुंबई, अजमेर, भुवनेश्वर, गांधीनगर, बेंगळुरू, कोची, चेन्नई, चंडीगढ, हैदराबाद, गुवाहाटी, वाराणसी आणि जमशेदपूर येथे निवासी रूफटॉप सोल्युशन यशस्वीरित्या लाँच केल्यानंतर महाराष्ट्रातील ग्राहकांना सुलभरित्या व कमी खर्चात वीजनिर्मिती करणारे सोलार रूफटॉप देऊ करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांनी याचा पूर्ण लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करतो.”

 टाटा पॉवर रिन्युएबल्सचे अध्यक्ष श्री. आशीष खन्ना या कार्यक्रमात म्हणाले, “आमच्या निवासी ग्राहकांना सोलार रूफटॉप स्थापनेच्या व्यावसायिक फायद्यांची तसेच दर्जाविषयक अंगांची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशा उपक्रमांमुळे तसेच किफायतशीर रूफटॉप सोल्युशन्समुळे आम्ही ग्राहकांना ऊर्जासंवर्धनात तसेच विजेवरील खर्च वाचवण्यात मदत करू शकू, अशी आशा वाटते. भारतातील पहिल्या क्रमांकाची रूफटॉप कंपनी हे स्थान कायम राहण्याचे कंपनीचे उद्दिष्टही आम्ही या माध्यमातून साध्य करू शकू.” सुरक्षितता हा या स्थापनेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. या यंत्रणेचे आयुष्य वाढवण्यासाठी स्थापनेचे काम सुरक्षितपणे व प्रभावीपणे व्हावे याची खात्री कंपनी करते. निवासी रूफटॉप विभागामुळे कंपनीचे देशातील सोलार रूफटॉप क्षेत्रातील आघाडीचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण-पूरक ऊर्जेच्या पर्यायांना चालना देण्यातील प्रमुख घटक म्हणून कंपनी काम करू शकेल. कंपनीने अलीकडेच हे सोल्युशन दिल्ली, मुंबई, भुवनेश्वर, अजमेर, गांधीनगर, बेंगळुरू, कोची, चेन्नई, चंडीगढ, हैदराबाद, गुवाहाटी, वाराणसी व जमशेदपूर येथे सुरू केले आणि येथील निवासी विभागातून या सोल्युशनला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुनर्वापराजोगी ऊर्जा अर्थात रिन्युएबल्स हे वाढीचे नवीन क्षेत्र असून, हे क्षेत्र अधिक मोठ्या प्रमाणात मूल्यनिर्मिती करणार आहे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेणार आहे.

टाटा पॉवर सोलार विषयी:

सौरऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातील गेल्या २९ वर्षांचा सखोल आणि सर्वंकष अनुभव असलेली टाटा पॉवर सोलार कंपनी ही जगात सौरऊर्जानिर्मितीचा पाया रचण्यात सहभागी असलेल्या कंपन्यांपैकी एक असून सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांची अभियांत्रिकी अधिप्राप्ती आणि उभारणी (ईपीसी) यांत विशेष प्राविण्य प्राप्त केलेली भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. १९८९ साली स्थापन झालेली ही कंपनी मूळात टाटा पॉवर आणि ब्रिटिश पेट्रोलियम सोलार (बीपी सोलार) या कंपन्यांचा संयुक्त उपक्रम म्हणून सुरू करण्यात आली होती. सौरऊर्जेच्या क्षेत्रात पायाभूत काम करणा-या व बाजारपेठेत अग्रस्थानी असलेल्या टाटा पॉवर सोलारचे मुख्यालय बेंगळुरू येथे असून ही कंपनी आता संपूर्णपणे टाटा पॉवरच्या मालकीची सहसंस्था म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत आहे.

भारतातील सर्वात मोठी सौरऊर्जानिर्मिती कंपनी म्हणून टाटा पॉवर सोलारकडून बेंगळुरू येथे जागतिक दर्जाचे ऊर्जाउत्पादन केंद्र चालवले जाते. या केंद्राची निर्मितीक्षमता मॉड्युल्सच्या संदर्भात ४०० मेगावॅट आहे, तर सेल्सच्या संदर्भात ३०० मेगावॅट इतकी आहे. कंपनीने आजवर २.६ गिगावॅट क्षमतेच्या जमिनीवरील यंत्रणा उभारणीचे काम पूर्ण केले असून आजवर देशाच्या विविध भागांमध्ये २६० मेगावॅटहून अधिक क्षमतेचे रूफटॉप आणि देशाच्या विविध भागांत ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे वितरण केले आहे. शहरी आणि ग्रामीण बाजारपेठांसाठीही कंपनीकडून सौरऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात रूफटॉप यंत्रणा, सोलार पंप आणि पॉवर पॅक्स आदी उत्पादनांचा समावेश आहे. सौरऊर्जा यंत्रणा सर्वत्र स्थापन व्हावी, यासाठी टाटा सोलार पॉवर कटिबद्ध असून आपल्या एकात्मिक सौर यंत्रणांच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी लोकांना वीजपुरवठा व्हावा, हे तिचे लक्ष्य आहे. अधिक माहितीसाठी www.tatapowersolar.com येथे भेट द्या.