शासकीय कर्मचाऱ्यांस तीन लाखांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

943

अनिल चौधरी,पुणे,

पालघर  येथील शासकीय कर्मचाऱ्यांस मनासारखे काम करण्यासाठी ३००००० (तीन)लाख रुपयांची लाच देताना तसेच ते करत असलेले शासकीय कर्तव्य बजाविण्यापासून परावृत्त करण्यासठी खाजगी आरोपी दिगंबर पुरषोत्तम जेठे वय ४७ वर्ष रा. विक्रमगड, जि.पालघर यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कॅम्प पालघर यांनी रंगेहात पकडले असून त्याला अटक केली आहे.

 याबाबत अधिक माहिती देताना पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणाले कि, तक्रारदार हे शासकीय कर्मचारी आहे. शासकीय कर्तव्य बजावीत आहेत. परंतु खाजगी व्यक्ती दिगंबर जेठे हा त्यांना मनासारखे काम करण्यासाठी सारखा दबाव  टाकत होता. तसेच त्यांना ते करत असलेले शासकीय कामात अडथळा निर्माण करत होता. त्यासाठी तो मोठी तीन लाखांची लाच देत होता. परंतु तक्रारदार शासकीय कर्मचाऱ्याची लाच घेण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागा पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने पडताळणी केली असता त्यात तथ्य असल्याचे समजले. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. त्यावेळी ३०००००(तीन) लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी दिगंबर पुरषोत्तम जेठे यांस रंगेहात पकडण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कॅम्प पालघर येथील अधिकारी कर्मचारी करत आहेत.